चिपळूण (रत्नागिरी) : जांभा दगड घेऊन जाणारा डंपर पलटी होऊन त्याखाली दुचाकी स्वार दबला आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजता दापोली मार्गावरील कुवे घाटात घडली. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीने वर्तवली आहे
घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून दगड काढण्याचे काम गतीने सुरू होते. या घटनेत दुचाकीस्वार नेमका कोण होता याची कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. दुचाकीवर एक जण होते की दोघेजण याबाबतही तपशील मिळत नाही. आज सकाळी जांभा दगड वाहतूक करणारा डंपर दापोलीहून खेडकडे येत असताना तो पलटी झाला.
कुवे घाटामध्ये एका अवघड वळणावर चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरची (एम एच 04 एफ जी 0972) जोरदार धडक दुचाकीला (एम एच 08 ए डी 3942 ) बसली यामध्ये डंपर रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये असलेले जांभ्या दगडाचे चिरे दुचाकी वर कोसळून दोघे स्वार याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डंपरला दुचाकीची धडक बसली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण या अपघातात ठार झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा– सरकारी जमिनी विका मालामाल व्हा –
धुक्यामुळे अपघाताची शक्यता
अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धुक्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिस आणि ग्रामस्थ घटनास्थली दाखल झाले आहेत. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : जांभा दगड घेऊन जाणारा डंपर पलटी होऊन त्याखाली दुचाकी स्वार दबला आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजता दापोली मार्गावरील कुवे घाटात घडली. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीने वर्तवली आहे
घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून दगड काढण्याचे काम गतीने सुरू होते. या घटनेत दुचाकीस्वार नेमका कोण होता याची कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. दुचाकीवर एक जण होते की दोघेजण याबाबतही तपशील मिळत नाही. आज सकाळी जांभा दगड वाहतूक करणारा डंपर दापोलीहून खेडकडे येत असताना तो पलटी झाला. कुवे घाटामध्ये एका अवघड वळणावर चिरे वाहतूक करणाऱ्या डंपरची (एम एच 04 एफ जी 0972) जोरदार धडक दुचाकीला (एम एच 08 ए डी 3942 ) बसली यामध्ये डंपर रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये असलेले जांभ्या दगडाचे चिरे दुचाकी वर कोसळून दोघे स्वार याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डंपरला दुचाकीची धडक बसली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण या अपघातात ठार झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा– सरकारी जमिनी विका मालामाल व्हा –
धुक्यामुळे अपघाताची शक्यता
अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धुक्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिस आणि ग्रामस्थ घटनास्थली दाखल झाले आहेत. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

News Story Feeds