मालवण( सिंधुदूर्ग) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व महाविभाग मुळदे, कुडाळ आणि येथील नीलक्रांती मत्स्य पर्यटन सहकारी संस्थेच्या संयुक्त सहकार्याने कांदळगाव येथे भूषण सुर्वे यांच्या मालकीच्या कातळावरील जमिनीत प्रायोगिक तत्त्वावर साकारलेला मत्स्यशेतीचा जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प यशस्वी ठरला आहे. या प्रकल्पातून सुमारे 10 हजार एवढे मत्स्यबीज उपलब्ध होईल, अशी माहिती देण्यात आली.
कांदळगाव येथील शेतकरी भूषण सुर्वे यांच्या खासगी मालकीच्या जमिनीत पावसाळी हंगामात जांभ्या कातळ जमिनीत तयार होणाऱ्या हंगामी तलावात स्थानिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेत गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा उपक्रम हाती घेण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत 19 ऑगस्ट 2019 ला कांदळगाव येथील सड्यावर पावसाळी हंगामात पाणी साचून तयार झालेल्या सुमारे दीड एकर क्षेत्रफळाच्या आणि सहा फूट खोलीच्या तळ्यात ही चाचणी घेण्यात आली होती.
हेही वाचा– नाणारनंतर आता राजापुरात आयलॉगचे रण
गोड्या पाण्यातील मत्स्यशेती
या तळ्यात गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प मुळदे येथे तयार करण्यात आलेले कटला आणि रोहू जातीचे सुमारे 30 हजार नग मत्स्यबीज वाढविण्यासाठी सोडण्यात आले. या ठिकाणी कातळावर साचणाऱ्या पाण्यात मत्स्यजीवाची वाढ आणि जगण्याचे प्रमाण तपासून अशा प्रकारचा उपक्रम यशस्वी होऊ शकेल का ? या चाचणीचे निष्कर्ष विद्यापीठ शास्त्रज्ञ व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतेच तपासण्यात आले. यातून अतिशय आशादायक निष्कर्ष प्राप्त झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा– वॉटर स्पोर्टस् मच्छीमारांत का पेटला संघर्ष….?
1750 मत्स्यबीज वाढले
सप्टेंबर 2019 व जानेवारी 2020 मध्ये मत्स्यबीजाची वाढ आणि जगण्याचे प्रमाण याची तपासणी मुळदे येथील शास्त्रज्ञांनी केली होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या मत्स्यबीजाची अंशतः काढणी करण्यात आली. पहिल्याच प्रयत्नात सुमारे 1750 वाढलेले मत्स्यबीज तळ्यातून काढून जिवंत स्थितीत वाहतूक करून धामापूर येथील तलावात सोडण्यात आले. काढणीच्या वेळी केलेल्या पाहणीत तळ्यातून सुमारे 10 हजार नग मत्स्यबीज मिळेल असे दिसून आले.
हेही वाचा– सिंधुदूर्ग कारागृहात कैद्याचा का झाला मृत्यू….?
वाढ सरासरी 100 ग्रॅम प्रतिनग
उरलेल्या बीजाची काढणीही लवकरच होणार आहे. प्राथमिक काढणीत ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. मत्स्यबीजाची वाढ सरासरी 100 ग्रॅम प्रतिनग एवढी मिळाली. डिसेंबरमध्ये परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत या तळ्यातील सुमारे 4 ते 5 हजार नग मत्स्यबीज वाहून गेल्याचे निदर्शनास आले होते. असे असतानाही अंदाजे दहा हजार नग मत्स्य बोटूकली या तळ्यातून प्राप्त होण्याचे चित्र आहे. त्यामुळे हा उपक्रम फायदेशीर असून अन्य ठिकाणी हा उपक्रम भविष्यात राबविण्यास शेतकऱ्यांना हंगामी काळात एक पर्यायी महत्त्वाचा उत्पन्न स्त्रोत निर्माण होऊ शकेल.
हेही वाचा– डंपर – दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार –
कोकण प्रांतात प्रथमच उपक्रम
कोकण प्रांतांत हा उपक्रम पहिल्यांदाच घेण्यात आला असून यात नीलक्रांती संस्थेचे प्रमुख रविकिरण तोरसकर यांचे मोलाचे प्रयत्न आहेत. गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धनात प्रकल्प प्रमुख डॉ. नितीन सावंत व त्यांचे सहकारी डॉ. मनोज कुगुरुवार, कृपेश सावंत यांनी मागील चार ते पाच महिने त्याची निरीक्षणे नोंदवून चाचणी यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवला. भविष्यात हा उपक्रम अजून आणखी शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी राबवून तो व्यापारी तत्त्वावर राबविण्यासाठी टीम प्रयत्न करत आहे, असे तोरसकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
जे शेतकरी, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, खासगी आस्थापनांना आगामी पावसाळी हंगामात मत्स्यपालन करावयाचे असेल त्यांनी संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या उपक्रमाचे सादरीकरण केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या अनुदानित योजनांमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नीलक्रांतीच्या सदस्या स्मिता केळुसकर यांनी सांगितले.

News Story Feeds