बांदा( सिंधुदूर्ग) : देशाचे भवितव्य घडविण्याचे काम हा नागरिकत्व कायदा करणार आहे. या कायद्यातील एकही कलम हे मुस्लिम विरोधी नाही आहे. हा कायदा मूळ भारतीय नागरिकांशी संबंधित नसून पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश मधून निर्वासित झालेल्या अल्पसंख्याकांशी संबंधित आहे, त्यामुळे याबाबत अपप्रचार करून लोकांची दिशाभूल व गैरसमज न पसरविता या कायद्याचा अभ्यास करावा, असे आवाहन वास्को-गोवा येथील देशप्रेमी विचारवंत जयंत जाधव यांनी येथे केले.

केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी, सीएए कायद्याच्या समर्थनार्थ देशप्रेमी नागरिक मंचाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, हिंदू जनजागरण समितीचे जिल्हा समन्वयक संदेश गावडे, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, उपसभापती शीतल राऊळ, विजयकुमार मराठे, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, श्यामकांत काणेकर, सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

हेही वाचा– चिनमधून परतलेल्या 22 जणांना जहाजात मज्जाव….

काँग्रेस सत्तेत असताना देशभर कायदा लागू

जयंत जाधव म्हणाले की, १९५५ मध्ये हा कायदा आणण्यात आला. या कायद्यात वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आली. २००९ मध्ये काँग्रेस सत्तेत असताना संपूर्ण देशभर हा कायदा लागू करण्यात आला. ९ डिसेंबर २०१९ रोजी गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडले. त्याला लोकसभेत व राज्यसभेत बहुमताने संमती देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी देखील केली.

हेही वाचा– आधारकार्ड लिंक करा आणि या योजनेचा लाभ घ्या….

धर्माच्या नावाखाली अल्पसंख्याकांचा छळ

मात्र काही दिवसानंतर या कायद्याला विरोध करण्यासाठी सुरुवात झाली. मात्र अर्धवट माहितीच्या आधारे हा विरोध घडवून आणला जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. या कायद्याला समर्थन देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे.
संदेश गावडे म्हणाले की, पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश मध्ये धर्माच्या नावाखाली अल्पसंख्याकांचा छळ होत आहे. त्यामुळे अत्याचार झालेल्यांना आश्रयासाठी भारतात यावे लागले. धर्माने पीडित आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी हा कायदा आहे. मात्र त्यासाठी देखील ११ नियमावली देण्यात आली आहे.

हेही वाचा– चितळे उद्योगसमुहाचा आधारस्तंभ हरपला :काकासाहेब चितळे यांचे निधन..

कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

तत्पूर्वी बांदा शहरातून नागरिकत्व कायद्याला समर्थन म्हणून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शेकडो देशप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. कट्टा कॉर्नर येथून राष्ट्रीगीताने रॅलीची सुरुवात करण्यात आली. साडेतीनशे फूट तिरंगा हातात घेऊन झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, एनआरसी कायदा झालाच पाहिजे, हिंदुस्तान जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय, हिंदुस्थान अंगार है, पाकिस्तान भंगार है अशा घोषणा देत सर्वपक्षीयांनी कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली. या रॅलीत युवकांचा व महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने होता. गांधीचौक, उभाबाजार, तेली तिठा, मोर्येवाडा, श्री बांदेश्वर मंदिर येथून कट्टा कॉर्नर चौक अशी रॅली काढण्यात आली.

उपस्थिती

यामध्ये माजी आमदार राजन तेली, प्रथमेश तेली, बांदा सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर, अशोक सावंत, जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सिद्धेश पावसकर, स्वागत नाटेकर, बाबा काणेकर, मराठा समाज अध्यक्ष बाळू सावंत, महिला मराठा अध्यक्ष अवंती पंडित, विशांत पांगम, दादू कवीटकर, महेश सारंग, महेश धुरी, केदार कणबर्गी, राजा सावंत, आबा धारगळकर, सचिन नाटेकर, निलेश सावंत, विकी केरकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, उपसरपंच हर्षद कामत, संदीप बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य अंकिता देसाई, किशोरी बांदेकर, मकरंद तोरस्कर, श्यामसुंदर मांजरेकर, साईप्रसाद काणेकर, संदेश पावसकर, मधू देसाई आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन रुपाली शिरसाट यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

News Item ID:
599-news_story-1581173117
Mobile Device Headline:
सिंधुदूर्गात काढली 'यासाठी' साडेतीनशे फूट तिरंगा रॅली…
Appearance Status Tags:
NRC, CAA Rally as support for the law  kokan marathi newsNRC, CAA Rally as support for the law  kokan marathi news
Mobile Body:

Vertical Image:
English Headline:
NRC, CAA Rally as support for the law kokan marathi news
Author Type:
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags:
पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, अत्याचार, भारत, मुस्लिम, जयंत जाधव, भाजप, हिंदू, Hindu, जिल्हा परिषद, विजयकुमार, नगर, जिल्हा बँक, मका, Maize, सरपंच, काँग्रेस, Indian National Congress, विधेयक, राष्ट्रपती, रामनाथ कोविंद, गीत, song, महिला, women, आमदार, बाळ, baby, infant, मराठा समाज, Maratha Community, ग्रामपंचायत
Twitter Publish:
Meta Keyword:
kokan NRC, CAA law Rally news
Meta Description:
NRC, CAA law Rally in sindudurg kokan marathi news
पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश मध्ये धर्माच्या नावाखाली अल्पसंख्याकांचा छळ होत आहे. त्यामुळे अत्याचार झालेल्यांना आश्रयासाठी भारतात यावे लागले.
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here