बांदा (सिंधुदूर्ग) : डेगवे-मोयझरवाडी येथील दिनेश शांताराम देसाई (वय ४५) यांना माकडतापाचे निदान झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. देसाई यांच्यावर गोवा-बांबोळी येथे उपचार सुरू असून, माकडताप रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
हेही वाचा – रविवारपासून जोतिबा डोंगर दुमदुमणार –
काजू हंगामात भीतीचे वातावरण
डेगवे गावात आठ दिवसांत दोन माकड मृतावस्थेत आढळली होती. ऐन काजू हंगामाच्या तोंडावर मृत माकडे सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. येथील दिनेश देसाई यांना बुधवारी (ता.५) ताप येत असल्याने त्यांना सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तापाचे प्रमाण कमी होत नसल्याने केएफडीची शक्यता असल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ गोवा-बांबोळी येथे हलविले.
हेही वाचा– कुणाची आई गेली तर कुणाचा बाप, आता सांत्वन करायचे तरी कुणाचे ?
उपाय माहिती पत्रकांचे वाटप..
आज सकाळी रक्ताचा अहवाल बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झाला. यामध्ये देसाई यांना माकडताप असल्याचे निदान झाले.ऐन काजू हंगामात माकडताप रुग्ण सापडल्याने डेगवे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. गावात विशेषता मोयझरवाडी येथे आरोग्य विभागाने सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे.
डेगवे-मोयझरवाडी येथे आरोग्य विभागाने सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच डेगवे ग्रामपंचायतीत डीएमपी ऑइल व मेलेथिन पावडरचा साठा ठेवला आहे. आरोग्य पथकाने घराघरात जाऊन माकडतापापासून बचाव करण्यासाठी माहिती पत्रकांचे वाटप केले आहे.
शरीरावर डीएमपी ऑईल लावून काम करा
शेतकऱ्यांनी काजू बागेत जाताना संपूर्ण शरीरावर डीएमपी ऑईल लावूनच जावे. गुरांच्या गोठ्यात दूषित गोचिडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेलेथिन पावडरचा वापर करावा. ताप किंवा खोकला, तोंड लाल होणे ही लक्षणे आढळल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.
– डॉ. मेधा अंधारी-कोकाटे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र-मोरगाव.

News Story Feeds