बांदा (सिंधुदूर्ग) : ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या भाग्यश्री संजय सातोस्कर (वय २६, रा. बांदा-काळसेवाडी) या युवतीची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज संपली.गोवा-मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी साडेआठ वाजता तिची प्राणज्योत मालविली. गेले ४ महिने तिच्यावर उपचार सुरू होते. आई-वडील व दोन लहान बहिणींची जबाबदारी खांद्यावर असलेल्या भाग्यश्रीच्या निधनाने अवघ्या बांदा शहरावर शोककळा पसरली आहे.
कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी भाग्यश्री ही शहरातील दुकानात काम करत होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये तिला ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रासल्याचे निदान झाले होते. मुळातच हलाखीची परिस्थिती असल्याने उपचारासाठी १० लाख रुपये खर्च हा सातोस्कर कुटुंबियांसाठी न पेलविणारा होता. यासाठी बांदावासीयांनी एकजूट दाखवत या भगिनीसाठी पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा– काळ आला होता पण वेळ आली नव्हती ; वाचले हे प्रवासी…
सोशल मीडियावरुन मदत
सोशल मीडियावर ‘हेल्प अवर भाग्यश्री, फाईट ब्लड कॅन्सर’ या शीर्षकाखाली मदतीचे कॅम्पेनिंग करण्यात आले. अवघ्या दोन दिवसांत या भगिनीसाठी ५ लाख रुपयांहून अधिक रक्कम गोळा झाली होती. दात्यांकडून मदतीचा ओघ अद्यापपर्यंत सुरू होता. तिच्यावर गोवा-मणीपाल रुग्णालयात उपचार सुरू होते. मध्यंतरी उपचारांना ती प्रतिसादही देत होती; मात्र ४ दिवसांत तिची प्रकृती खालावली. उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आज सकाळी तिचे निधन झाले.
हेही वाचा-…तर मुली पुढाकार कधी घेणार? –
आज सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार
शोकाकुल वातावरणात आज सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अंत्यदर्शनासाठी बांदावासीयांनी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी साश्रुनयनांनी तिला निरोप देण्यात आला. तिच्या मागे आई-वडील, दोन बहिणी, काका असा परिवार आहे.

News Story Feeds