साटेली भेडशी (सिंधुदूर्ग) : कोल्हापूरहून दोडामार्गकडे जाणारी एसटी बस काल (ता. ९) सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान तिलारी घाटात रस्ता सोडून गटारात गेली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. तीव्र उतार आणि वळण यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघातग्रस्त बस रात्री बाहेर काढण्यात आली. सुदैवाने अपघातात कुणीही जखमी झाले नाही.
हेही वाचा– निव्वळ पांढऱ्या तांबड्यासाठी 55 लाखांची उलाढाल –
तिलारी घाटरस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण केल्याने घाटातून ये-जा करणारी वाहने बेदरकारपणे हाकली जातात. चालक तीव्र उतार आणि नागमोडी वळणाकडे दुर्लक्ष करतात. काल सायंकाळी कोल्हापूर आगाराची एसटी बस (एमएच १४ बीटी ३५५०) गटारात गेली. गटारालगत बांधलेल्या दगडी भिंतीवर ती आढळून मोठा अपघात घडला असता; पण चालकाने प्रसंगावधान राखल्याने पुढील अनर्थ टळला. घाट उतरताना उजव्या आणि डाव्या बाजूला मोठी दरी आहे. कठड्यावर आदळून एसटी बस दरीत कोसळली तर वित्त आणि जीवितहानी होण्याची भीती होती.
हेही वाचा– पिंजऱ्यात मिळणार मगरींना जीवदान….
चालकांनी सावधगिरी बाळगावी
तिलारीनगर ते दोडामार्ग या सुमारे ४० किलोमीटर अंतराच्या रस्त्यात चंदगड, कोल्हापूर आगाराच्या एसटी गाड्यांचे अनेक अपघात झाले आहेत. त्यातील बहुतेक अपघात चालकांच्या बेपर्वाईमुळे झाले होते. त्यामुळे त्या आगारातील चालकांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले

News Story Feeds