रत्नागिरी : शहरातील फेरीवाले, हातगाडी, टपऱ्याधारक, भाजी-पाला विक्रेते, अगदी डोक्यावरून वस्तू घेऊन फिरणारे अशा सर्व पथविक्रेत्यांचा उपजीविकेचा दर्जा आता उंचावणार आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत या सर्वांचा मोबाईल ॲपद्वारे सर्व्हे सुरू आहे. मोबाईल, आधारकार्डशी जोडला जाणार आहे. त्यामुळे एका क्लिकवर या सर्वांची माहिती उपलब्ध होणार असून, शहरामधील त्यांचे लोकेशनदेखील पालिकेला समजणार आहे. आतापर्यंत सुमारे ४०० जणांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. १ हजार होतील, असा अंदाज आहे.
फेरीवाल्यांचे मोबाईल ॲपद्वरे सर्वेक्षण
केंद्र व राज्य शासनाने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान हाती घेतले आहे. अभियानाअंतर्गत शहर फेरीवाल्यांना साहाय्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. पालिका क्षेत्रातील सर्व पथविक्रेत्यांचे मोबाईल ॲपद्वारे सर्वेक्षण सुरू झाले आहे. रत्नागिरी तालुका बेरोजगारांची स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत हे काम केले जात आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्या हद्दीमध्ये व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे मोबाईल ॲपद्वरे सर्वेक्षण सुरू झाले आहे. तीन महिन्यांपासून हे सर्वेक्षण सुरू झाले आहे.
हेही वाचा– चालकाचे प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर होते म्हणून टळला हा अनर्थ…
शहरातील ४०० जणांची नोंद
त्यानुसार शहरातील ४०० जणांची नोंदणी झाली आहे. सुमारे १ हजार पथविक्रेते असण्याची शक्यता आहे. त्यापैकी ७०० जणांचे उद्दिष्ट पालिकेला दिले आहे. त्यानुसार काम सुरू झाले आहे. ॲपद्वारे फेरावाल्यांवर लक्ष ठेवता येणार आहे. फेरीवाल्याना एका ठिकाणी थांबता येणार नाही आणि थांबले तर जीपीएस प्रणालीद्वारे त्यांचे लोकेशन कळणार असल्याने त्यांच्यावर पालिकेचा वचक राहणार आहे. पालिकेला चांगले उत्पन्न मिळणार आहे.
हेही वाचा– दिव्यांग असूनही तिला शिकायच आहे पण….
शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळणार
नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेत त्यांचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. तसेच त्यांची संस्था स्थापन करून शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ देण्यात येणार आहे. एकूणच त्यांचा उपजीविकेच्या दर्जा उंचवाण्याच्यादृष्टीने शासनाने पावले उचलली आहेत. पालिकेकडे आजही या विक्रेत्यांची माहिती उपलब्ध नाही. हातावरच्या बोटावर मोजण्याएवढ्याच फेरीवाल्यांची नोंद आहे. ऑनलाइन नोंदणीमुळे सर्वांची माहिती पालिकेकडे राहणार असल्याने महसुलातही भर पडणार आहे. हॉकर्स झोन तयार करणे आता सोपे होणार आहे.
एका क्लिकवर माहिती
शहरातील फेरीवाल्यासह सर्व पथविक्रेत्यांची ऑनलाइन नोंदणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत पावत्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून कर वसूल केला जात होता. आता शहरातील सर्व पथविक्रेत्यांची एका क्लिकवर माहिती मिळणार आहे.
– प्रशांत ठोंबरे, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका

News Story Feeds