दापोली ( रत्नागिरी ) : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या मेसवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. येथील पाच मेस चालकांकडून प्रत्येकी 3 हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. कृषी महाविद्यालयाचे उपाहारगृह व कृषी महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न निरीक्षकांनी तपासणी केली. त्यात विविध त्रुटी आढळल्या. त्यानंतर ही कारवाई झाली.
कृषी महाविद्यालयाच्या उपहारगृह चालकाकडून 5 हजार तर प्रशासकीय इमारतीमधील उपाहारगृह चालकाकडून 4 हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी येथील अन्न व औषध प्रशासनाचे अन्न निरीक्षक प्रशांत गुंजाळ यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिनस्त महाविदयालयांच्या वसतिगृहाच्या मेसची तपासणी केली. त्यात जयप्रभा मुलींचे वसतिगृह, जिजाऊ मुलींचे वसतिगृह, रत्नदुर्ग मुलांचे वसतिगृह, सिंधुदुर्ग मुलांचे वसतिगृह, सुवर्णदुर्ग मुलांचे वसतिगृह यांचा समावेश आहे.
या मेस अन्न व औषध प्रशासनाच्या निकषाप्रमाणे चालविल्या जात नव्हत्या, त्यात त्रुटीही आढळल्या. या मेस चालविणाऱ्यांकडे अन्न व औषध प्रशासनाला आवश्यक असणारा परवानाही नव्हता. त्यामुळे परवाना मिळेपर्यंत या मेस बंद ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी दिले होते. आता परवान्यासाठी अर्ज दाखल केल्यावर या मेस पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.
मेस चालविणाऱ्या ठेकेदारांकडून प्रत्येकी 3 हजार रुपयांचे तडजोड शुल्क, कृषी महाविदयालयाचे उपाहारगृह चालविणाऱ्या ठेकेदाराकडून 5 हजार रुपयांचे तडजोड शुल्क तर कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील उपाहारगृह चालकाकडून 4 हजार रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले असल्याची माहिती अन्न निरीक्षक गुंजाळ यांनी दिली.
त्रुटींची पूर्तता करण्यासाठी बंद
वसतिगृहातील मेसमधील अन्नधान्याचे तसेच तेल आदी खाद्य सामानाचे नमुनेही घेण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचीही माहिती देण्यात आली. अन्न निरीक्षकांच्या तपासणीनंतर त्यांनी लेखी दिलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील उपाहारगृह बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, काल (ता.10) पासून ते पुन्हा सुरू केले आहे.

News Story Feeds