रत्नागिरी – केंद्र शासनाने लागू केलेल्या भारतीय नागरिकत्व कायद्याचा चांगलाच धसका नागरिकांनी घेतला आहे. एनआरसी अंतर्गत नागरिकत्व नोंदणीसाठी जन्मदाखला अत्यावश्यक आहे. त्यामुळे जन्म दाखल्यासाठी दररोज शेकडो नागरिक रत्नागिरी पालिकेच्या सेतू कार्यालयात हजेरी लावत आहेत. इतर वेळी जन्मदाखल्यासाठी अर्ज करण्याची संख्या दिवसाला साधारण 50 होती. मात्र या कायद्यामुळे आता दिवसाला जन्म दाखल्यासाठी सुमारे 180 अर्ज येतात. साधारण दीडपट अर्जांची संख्या वाढली आहे.
केंद्र शासनाने एनआरसी कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जाणार आहे. एनआरसी अंतर्गत प्रत्येक नागरिकांकडे त्याच्या वास्तव्याचा पुरावा घेतला जाणार आहे. रत्नागिरी शहरातदेखील बांग्लादेशमधून येऊन वास्तव्य करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. एनआरसी कायद्याच्या भीतीपोटी अनेक नागरिकांची जन्मदाखला मिळविण्यासाठी पालिकेच्या सेतू कार्यालयात मोठी गर्दी होऊ लागली आहे.
हेही वाचा – लयभारी ! दुबईला जाणार रत्नागिरीची कलिंगडे
फेब्रुवारीच्या सुरवातीपासून जन्म दाखल्यासाठी सेतू कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या दीडपट झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. जानेवारीपर्यंत दररोज सरासरी 50 ते 60 जणांकडून जन्म दाखल्यांसाठी अर्ज केले जात होते. परंतु एनआरसी कायदा लागू झाल्यानंतर जन्म दाखला मिळवण्यासाठी अर्जदारांची संख्या तिप्पट झाली आहे.
हेही वाचा – कोकण कृषी विद्यापीठातील पाच मेसवर कारवाई
1 फेब्रुवारीपासून जन्म दाखल्याकरिता सरासरी 180 ते 200 अर्ज पालिकेच्या सेतू कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून जन्म दाखल्यासाठी सेतू कार्यालयासमोर रांगा लावल्या जात आहेत. जन्म दाखल्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या जन्माची नोंद असल्यास त्यांना जन्म दाखला दिला जात आहे. नावात बदल, वेळेत नोंद नाही, असे अनेक नागरिक रत्नागिरीत आहेत. या सर्व नागरिकांना जन्म दाखला मिळवताना प्रचंड अडचणी येत आहेत.
हेही वाचा – यंदा हापूसचे `इतकेच` उत्पादन
त्यांचे अर्ज नामंजूर
ज्यांच्या जन्माची नोंद नाही, त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात येत आहेत. त्यांना त्यासाठी उपलब्ध असलेले कागदपत्र घेऊन न्यायालयात जावे लागते. तेथे पूर्ण चौकशी झाल्यानंतर न्यायालयाच्या विशेष परवानगीने त्यांची नोंदणी केली जाते. मात्र तशी कागदपत्रे संबंधितांकडे असणे आवश्यक आहे.

News Story Feeds