कडावल (सिंधुदूर्ग) : पंढरपूरहून आणलेल्या गंगाजलाचे विधिवत पूजन करण्याची परिसरात प्रथा आहे. आता माघ वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी माघारी परतल्याने गावोगावी गंगापूजनाचे कार्यक्रम होत आहेत. यानिमित्त गावजेवणाच्या पंगती उठत आहेत. हरिपाठ, भजन व कीर्तनाने रात्री जागू लागल्या आहेत. एकंदरीत गंगापूजनामुळे वारकऱ्यांच्या घरात आनंदी व उत्साही वातावरणनिर्मिती होत आहे.पंढरपूरला गेलेले वारकरी परत येताना सोबत चंद्रभागेचे जल तीर्थ म्हणून घेऊन येतात.

हेही वाचा– मच्छीमारांना हवी आहे आता कर्ज माफी…

यंदा पंढरपूरला मोठ्या प्रमाणात वारकरी

या पवित्र जलाला गंगाजल असे म्हटले जाते.  घरात आणलेल्या या गंगाजलाचे ब्राह्मणाच्या हस्ते विधिवत पूजन करण्याची प्रथा येथे पूर्वापारपासून प्रचलित आहे. आषाढ, कार्तिक व माघ इत्यादी तिन्ही वा-यांना जाणारे वारकरी आपल्या घरी परतल्यावर आवर्जून गंगापूजन करतात. सकाळी ब्राह्मणाच्या हस्ते विधिवत गंगापूजन झाल्यानंतर दुपारी उपस्थितांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो. तर सायंकाळनंतर हरिपाठ, भजन, कीर्तन यांसारखे कार्यक्रम होतात. कडावल दशक्रोशीतून माघ वारीसाठी यंदा पंढरपूरला मोठ्या प्रमाणात वारकरी गेले होते. यातील बहुतेक सर्वजण आता पुन्हा आपल्या गावी परतले आहेत. परंपरेनुसार ते चंद्रभागेचे जल म्हणजेच गंगाजल सोबत घेऊन आले आहेत.

हेही वाचा– तीच्या नावे आले पीएम सहायता निधीचे पत्र.. पण पोस्ट कार्यालयानेच केले..

गावजेवणावळी सुरू

या गंगाजलाचे विधिवत पूजन प्रत्येक वारकऱ्यांच्या घराघरात होत आहे. यजमानाच्या ऐपतीप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन होत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबातील वारकरी गंगापूजनाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावाला निमंत्रित करत आहेत. ब्राह्मणाच्या हस्ते विधिवत पूजन करून गावजेवणासाठी मोठा खर्च करत आहेत. तर गरीब कुटुंबातील वारकरी या कार्यक्रमात डामडौल न करता काटकसरीने खर्च करत आहेत.

हेही वाचा– एनआरसीच्या भीतीने `येथे` जन्म दाखल्यांसाठी गर्दी

आनंदी वातावरण अन्‌ उत्साह

माघ वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी आता आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याच्या घरात गंगापूजनाचे कार्यक्रम होत आहेत. यानिमित्ताने गावजेवणाच्या पंगती उठत आहेत. हरिपाठ, भजन व कीर्तनाने रात्री जागू लागल्या आहेत. एकंदरीत गंगापूजनामुळे वारकऱ्याच्या घरात आनंदी व उत्साही वातावरणनिर्मिती होत आहे.

News Item ID:
599-news_story-1581483101
Mobile Device Headline:
गंगापूजनामुळे गावागावांत उत्साह ; भजनासह कीर्तनाचा गजर
Appearance Status Tags:
warkari return on pandharpur Excitement in the sindudurg villages kokan marathi newswarkari return on pandharpur Excitement in the sindudurg villages kokan marathi news
Mobile Body:

कडावल (सिंधुदूर्ग) : पंढरपूरहून आणलेल्या गंगाजलाचे विधिवत पूजन करण्याची परिसरात प्रथा आहे. आता माघ वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी माघारी परतल्याने गावोगावी गंगापूजनाचे कार्यक्रम होत आहेत. यानिमित्त गावजेवणाच्या पंगती उठत आहेत. हरिपाठ, भजन व कीर्तनाने रात्री जागू लागल्या आहेत. एकंदरीत गंगापूजनामुळे वारकऱ्यांच्या घरात आनंदी व उत्साही वातावरणनिर्मिती होत आहे.पंढरपूरला गेलेले वारकरी परत येताना सोबत चंद्रभागेचे जल तीर्थ म्हणून घेऊन येतात.

हेही वाचा– मच्छीमारांना हवी आहे आता कर्ज माफी…

यंदा पंढरपूरला मोठ्या प्रमाणात वारकरी

या पवित्र जलाला गंगाजल असे म्हटले जाते.  घरात आणलेल्या या गंगाजलाचे ब्राह्मणाच्या हस्ते विधिवत पूजन करण्याची प्रथा येथे पूर्वापारपासून प्रचलित आहे. आषाढ, कार्तिक व माघ इत्यादी तिन्ही वा-यांना जाणारे वारकरी आपल्या घरी परतल्यावर आवर्जून गंगापूजन करतात. सकाळी ब्राह्मणाच्या हस्ते विधिवत गंगापूजन झाल्यानंतर दुपारी उपस्थितांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो. तर सायंकाळनंतर हरिपाठ, भजन, कीर्तन यांसारखे कार्यक्रम होतात. कडावल दशक्रोशीतून माघ वारीसाठी यंदा पंढरपूरला मोठ्या प्रमाणात वारकरी गेले होते. यातील बहुतेक सर्वजण आता पुन्हा आपल्या गावी परतले आहेत. परंपरेनुसार ते चंद्रभागेचे जल म्हणजेच गंगाजल सोबत घेऊन आले आहेत.

हेही वाचा– तीच्या नावे आले पीएम सहायता निधीचे पत्र.. पण पोस्ट कार्यालयानेच केले..

गावजेवणावळी सुरू

या गंगाजलाचे विधिवत पूजन प्रत्येक वारकऱ्यांच्या घराघरात होत आहे. यजमानाच्या ऐपतीप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन होत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबातील वारकरी गंगापूजनाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावाला निमंत्रित करत आहेत. ब्राह्मणाच्या हस्ते विधिवत पूजन करून गावजेवणासाठी मोठा खर्च करत आहेत. तर गरीब कुटुंबातील वारकरी या कार्यक्रमात डामडौल न करता काटकसरीने खर्च करत आहेत.

हेही वाचा– एनआरसीच्या भीतीने `येथे` जन्म दाखल्यांसाठी गर्दी

आनंदी वातावरण अन्‌ उत्साह

माघ वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी आता आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याच्या घरात गंगापूजनाचे कार्यक्रम होत आहेत. यानिमित्ताने गावजेवणाच्या पंगती उठत आहेत. हरिपाठ, भजन व कीर्तनाने रात्री जागू लागल्या आहेत. एकंदरीत गंगापूजनामुळे वारकऱ्याच्या घरात आनंदी व उत्साही वातावरणनिर्मिती होत आहे.

Vertical Image:
English Headline:
warkari return on pandharpur Excitement in the sindudurg villages kokan marathi news
Author Type:
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags:
वारी, गंगा, Ganga River, कर्ज, ब्राह्मण, सकाळ, एनआरसी, NRC
Twitter Publish:
Meta Keyword:
kokan sindudurg warkari news
Meta Description:
warkari return on pandharpur Excitement in the sindudurg villages kokan marathi news
माघ वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी आता आपल्या गावी परतले आहेत. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याच्या घरात गंगापूजनाचे कार्यक्रम होत आहेत.
Send as Notification:

News Story Feeds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here