वैभववाडी (सिंधुदूर्ग) : कोकिसरे ते एडगाव तिठा असा पाठलाग करून पोलिसांनी पावणेदोन लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. पोलिसांनी दारूसह ३ लाख ३८ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई आज पहाटे साडेचारच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी जितेंद्र अशोक मोहिते (रा. पलूस, जि. सांगली), रोहित राजेंद्र कांबळे (रा. इस्लामपूर) या दोघांना अटक केली आहे. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांची तीन दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे.
हेही वाचा- तंबाखूच्या व्यसनावर विद्यार्थ्यांच्या शब्दशस्त्राचा वार….
हवालदार अशोक सांवत आणि कॉन्स्टेबल प्रसाद पाटील काल रात्री गस्तीवर होते. पहाटे चारच्या सुमारास त्यांना कोकिसरे रेल्वेफाटकाजवळ संशयास्पद गाडी (५३७१) दिसली. गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु ती गाडी गगनबावड्या दिशेने सुसाट निघाली. पोलिस गाडीने त्याचा पाठलाग करून एडगाव तिठा येथे गाठले. गाडी थांबवून त्या गाडीची झडती घेतली असता बॉक्स आढळले. त्यात गोवा बनावटीची दारू होती.
हेही वाचा– गंगापूजनामुळे गावागावांत उत्साह ; भजनासह कीर्तनाचा गजर
पाठलागानंतर दारूसाठा जप्त
ही माहिती पोलिस ठाण्यात देताच सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, राजेंद्र खेडकर, मारूती साखरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गाडीतील दोघांना ताब्यात घेतले. गाडीमध्ये एक लाख ८३ हजार ४० रूपये किंमतीचे गोवा बनावटीचे २६ बॉक्स होते. पोलिसांनी दारू, दीड लाख रूपये किमंतीची गाडी आणि आठ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल असा तीन लाख ३८ हजार ४० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी व्होल्वो बसवर कारवाई केली होती.

News Story Feeds