दापोली (रत्नागिरी) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा 38 वा दीक्षांत समारंभ रविवारी (ता. 16) सकाळी 11 वाजता कृषी विद्यापीठाच्या विजय क्रीडासंकुलात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या सोहळ्याची तयारी जोरदार सुरू आहे.
कार्यक्रमाला राज्याचे कृषीमंत्री दादासाहेब भुसे, पालकमंत्री अनिल परब, कुलगुरू डॉ. संजय सावंत, विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य, माजी कुलगुरू आदी उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत समारंभात 3 हजार 524 पदवीकांक्षी स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येईल. त्यामध्ये 63 आचार्य (पीएच.डी.), 317 पदव्युत्तर पदवी, 3 हजार 144 पदवी प्राप्त स्नातकांचा समावेश आहे. पदवीदान समारंभासाठी 1 हजार 563 पदवीकांक्षी स्नातक पदवी ग्रहण करणार आहेत.
हेही वाचा– पोलिसांचा चित्रपट थरार ; मुद्देमालासह आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
राज्यपाल कोश्यारी स्नातकांना संबोधित करणार
सन 2017 -18 व 2018-19 या शैक्षणिक वर्षामधील 29 स्नातकांना विद्यापीठ सुवर्णपदके, 20 स्नातकांना खासगी संस्था पुरस्कृत विविध सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी स्नातकांना संबोधित करणार आहेत. पदवीदान समारंभाच्या निमित्ताने विजय क्रीडा संकुलामध्ये विद्यापीठाने आजवर केलेल्या संशोधनाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये कोकणातील विविध फळे, पिके, जनावरे, कृषी अवजारे, मत्स्य यातील तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

News Story Feeds