कुडाळ ( सिंधुदुर्ग ) – घोटगे सोनवडे घाट रस्त्याच्या प्रकल्प किमतीच्या दोन टक्के म्हणजेच 4 कोटी 20 लाख रूपयांची रक्कम सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठानकडे भरणे आवश्यक आहे. याकडे आमदार वैभव नाईक, आमदार प्रकाश आबिटकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे लक्ष वेधले. त्यावर अशोक चव्हाण यांनी ही रक्कम लवकरात लवकर देण्याचे मान्य केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हयातील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. या बैठकीत घोटगे सोनवडे घाट रस्त्याच्या निधीबाबत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा – शिक्षकांच्या ऑनलाईन पोर्टलवर ही हवी माहिती
यावेळी सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी, मुख्य अभियंता प्रकाश इंगोले, रस्ते सचिव सी. पी. जोशी, सिंधुदुर्गमधील कार्यकारी अभियंता युवराज देसाई, श्री. शेवाळे उपस्थित होते. घोटगे सोनवडे घाटमार्गास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत अटी व शर्थीच्या आधारे मंजुरी मिळाली आहे.
त्याबाबत केंद्रीय मंत्रालयाने 29 ऑगस्ट 2019 ला कळविले; मात्र प्रकल्प किंमतीच्या दोन टक्के रक्कम म्हणजेच 4 कोटी 20 लाख रूपये सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठान यांच्याकडे भरायची आहे. ती भरल्यानंरच त्याबाबत अहवाल वन्यजीव विभाग तपासणीसाठी हाती घेणार आहे.
हेही वाचा – माझ्याशी लग्न नाही केलं तर…
याबाबत आमदार वैभव नाईक, आमदार प्रकाश आबिटकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली व लवकरात लवकर निधीची तरतूद करण्याची मागणी केली. त्यावर अशोक चव्हाण यांनी सह्याद्री व्याघ्र प्रतिष्ठान यांच्याकडे भरणा करण्यास आवश्यक असलेला निधी लवकरात लवकर देण्याचे मान्य केले आहे, अशी महिती आमदार नाईक यांनी दिली.

News Story Feeds