मालवण ( सिंधुदुर्ग ) – तारकर्ली गावच्या तहकूब झालेल्या ग्रामसभेत मागील सभेच्या इतिवृत्त वाचन व त्यातील ठरावाना मंजुरी देण्याच्या विषयावरून वाद झाला. यात सभेच्या अध्यक्षा सरपंच स्नेहा केरकर यांनी सभात्याग केल्याने उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला व ग्रामपंचायतीसच टाळे ठोकले. पर्यटनाच्या दृष्टीने वेगळी ओळख असलेल्या तारकर्ली गावात प्रथमच संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीस टाळे ठोकले. यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे.
हेही वाचा – माझ्याशी लग्न नाही केलं तर…
जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी तारकर्लीत येऊन आमचे म्हणणे ऐकून घेत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीला ठोकलेले टाळे उघडणार नाही, असा इशारा तारकर्ली ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिला. तारकर्ली ग्रामपंचायतीच्या प्रजासत्ताक दिनाची तहकूब झालेली ग्रामसभा काल बोलाविली होती. ग्रामसभा सुरू झाल्यावर मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन सचिवांकडून सुरू असताना त्यांचा आवाज मागच्या ग्रामस्थांपर्यंत जात नसल्याने एका ग्रामस्थाने मोठ्याने इतिवृत्त वाचन करण्याची विनंती केली. या विनंतीस सभा अध्यक्ष सरपंच स्नेहा केरकर यांनी आक्षेप घेत नियमांवर बोट ठेवत त्या ग्रामस्थांस तुम्ही मतदार नसल्याने सभेत बोलू नये, असे सांगितले.
हेही वाचा – आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज
यावरून ग्रामस्थ व सरपंच यांच्यात निर्माण झालेल्या वादात सरपंच केरकर यांनी सभात्याग करत असल्याचे सांगितले. या सभेचे कामकाज पूर्ण न होताच सरपंचांनी सभात्याग केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ग्रामपंचायतीमध्येच ठाण मांडला. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत ग्रामपंचायतीत ठाण मांडून अखेर सरपंच न फिरकल्याने ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. आजच्या दुसऱ्या दिवशीही ग्रामस्थांनी सकाळपासून ग्रामपंचायतीकडे ठाण मांडला होता. यावेळी ग्रामस्थानी ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
दादा कुबल, डॉ. बाळा परब, वैभव सावंत, राजू मेस्त्री, भिवा कोळंबकर, अजिंक्य पाटकर, संदेश गोसावी, मेघनाथ मयेकर, संजय खराडे, मृणाली मयेकर, वैष्णवी मेस्त्री, सुप्रिया भोवर, मिथिलेश मीठबावकर, जयवंत सावंत, देवेंद्र खवणेकर, घनश्याम कुबल, नंदकुमार टिकम, बजरंग कुबल, निवृत्ती कोळंबकर आदी उपस्थित होते.

News Story Feeds