चिपळूण( रत्नागिरी) : रुग्णांना जलद वैद्यकीय सेवा मोफत मिळाव्यात, यासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात कोट्यवधींचा खर्च करून भौतिक सुविधा निर्माण केल्या. मात्र उपचार व सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच नाहीत. प्रमुख रिक्त पदांमुळे रुग्णसेवेचा बोजवारा उडाला आहे. किरकोळ उपचार करून येथून पेशंट रेफर करण्यापुरतेच रुग्णालय उरले आहे. काही वर्षांपूर्वी कामथे येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रशस्त इमारत उभी करण्यात आली.
सुरवातीची काही वर्षे चांगल्या आरोग्य सेवा सुविधा मिळत होत्या. गेल्या काही वर्षांपासून रुग्णसेवेचा बोजवारा उडाला आहे. नियुक्त वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात नियमित हजेरी लावत नाहीत. राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी मध्ये नोकरी सोडून देतात. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलज्ज्ञ, सहाय्यक अधीक्षक, बाह्यरुग्ण लिपिक, परिसेविका, नेत्रचिकित्सा अधिकारी आदींसह तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मेजर ऑपरेशन थिएटर धूळ खात पडले आहे. त्यामुळे मोफत शस्त्रक्रियेपासून रुग्ण वंचित आहेत.
हेही वाचा– सिंधुदुर्गात पाठीवरचे ओझे आता होणार कमी…
धूळ खात मेजर ऑपरेशन थिएटर
रुग्णालयाच्या इमारतीवर सोलर सिस्टीम बसवण्यात आली होती; मात्र तीन-चार वर्षांपासून त्याची देखभाल दुरुस्ती केलेलीच नाही. त्यामुळे ही सिस्टीम भंगारात निघाली. रुग्णांना गरम पाणी मिळण्यासाठी गिझरचा वापर केला जातो. इमारतीवर पत्र्याची शेड उभी करण्यात येत आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च केलेली सोलर सिस्टीम भंगारात निघाली आहे. सोनोग्राफी मशिन गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. पुढाऱ्यांनी कितीही आवाज उठवला तरी त्यात काडीमात्र बदल झालेला नाही. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गरोदर मातांना खासगी डॉक्टरकडे अनुदानावर सोनोग्राफी करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा– गंगापूजनामुळे गावागावांत उत्साह ; भजनासह कीर्तनाचा गजर
पदे रिक्त असल्याने सेवेस अडचणी
कामथे उपजिल्हा रुग्णालयास रिक्त पदांची समस्या भेडसावत आहे. कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आम्ही जास्तीत जास्त रुग्णसेवा देऊन, उपचार देण्याचा प्रयत्न करतो. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवा देण्यात अडचणी येत आहेत. आवश्यक साधनांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
–डॉ. सानप, वैद्यकीय अधिकारी, कामथे उपजिल्हा रुग्णालय.
हेही वाचा– तंबाखूच्या व्यसनावर विद्यार्थ्यांच्या शब्दशस्त्राचा वार….
वातानुकूलित यंत्रणा सडतेय
ट्रॉमा केअर युनिटसाठीदेखील कोट्यवधींचा खर्च झाला. इमारत उभी करण्यात आली. त्यात वातानुकूलित यंत्रणाही आहे. मशिनरीदेखील आल्या; मात्र वैद्यकीय सेवा देण्यास अधिकारी नाहीत. सर्व सहाय्यभूत साधनांचाही पुरवठा झालेला नाही. दोन वर्षांपूर्वी बसवलेली वातानुकूलित यंत्रणा सडत चालली आहे.
हेही वाचा– पशुधनासाठी एवढ्या मोठ्या दवाखान्यांचा उपयोग काय ?
दृष्टिक्षेपात..
वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता
डॉक्टर मध्येच नोकरी जातात सोडून
सोलर सिस्टीम चालली भंगारात
ऑपरेशन थिएटर धूळ खात

News Story Feeds