रत्नागिरी : कामचुकार व लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पवित्रा घेतला आहे. कर्मचाऱ्यांकडून बायोमेिट्रकवर नियमित थम करून त्याची नोंद गुगल शिटमध्ये करण्याचे आदेश सामान्य प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दर दिवशी घेतला जात आहे. रिक्त पदांची संख्या अधिक असल्यामुळे आहे, त्या कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेण्यासाठी हा फंडा राबविण्यात आला आहे.
जिल्हा परिषद अंतर्गंत कार्यरत सर्व कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची दैनंदिन उपस्थिती दर्शवण्यासाठी बायोमेट्रीक मशीनवर हजेरी सक्तीची राहणार आहे. त्याबाबत सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांची हजेरी बायोमेट्रीक मशिनवर नोंदविणे आवश्यक आहे. यापूर्वीही प्रशासनाच्या वतीने सूचना दिल्या आहेत. सर्व विभागाच्या खातेपमुखांना त्यासाठी जि. प. सामान्य प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावली आहे.
हेही वाचा– कोकण कृषी विद्यापीठात तब्बल एवढे विद्यार्थी घेणार पदवी…
नोंद गुगल शिटमध्ये
प्रत्येक खातेप्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील विविध संवर्गातील कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी यांची बायोमेट्रीक प्रणालीवरील उपस्थिती नियमित पहावी, अशाही सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. काही कर्मचारी कार्यालयीन उपस्थित असून देखील बायोमेट्रीक मशिनवर हजेरी का लावत नाहीत, याबाबत खुलासा तत्काळ सादर करावा लागणार आहे.
हेही वाचा- माझ्याशी लग्न नाही केलं तर…
सक्त सूचनां करणयात आली आहे.
कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्यांची बदली झालेली आहे. जिल्ह्यातून बदली झाली असेल किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने आले असतील तर त्यासाठी ट्रान्स्फर आऊट किंवा ट्रान्स्फर इनच्या सुविधेनुसार योग्य ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. बायोमेट्रीक हजेरीसाठी तसेच मशिनवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीसाठी सर्व खातेप्रमुख यांनी त्यांचे कार्यालयात संनियंत्रकाची नेमणूक करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. जि. प.चे सर्व विभाग, तसेच सर्व पंचायत समिती गटविकास अधिकारी, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा यांना याचे सक्त सूचनांचे पत्रकच धाडण्यात आले आहे.
हेही वाचा – शिक्षकांच्या ऑनलाईन पोर्टलवर ही हवी माहिती
कार्यालयाबाहेर बराच वेळ घालवतात..
रत्नागिरी जिल्हा परिषदेला ‘आयएसओ’ मानांकनाचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे प्रशासकीय कारभार गतिमान करण्यासाठी प्रशासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. कर्मचाऱ्यांनाही कार्यालयीन कामासाठी सदैव तत्पर राहणे आवश्यक आहे. कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांनी यावे, यासाठी जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समितीत बायोमेट्रीक हजेरीला प्राधान्य देण्यात आलेले आहे. तरीही कार्यालयीन वेळेत बायोमेट्रीक हजेरीला बगल देणे, त्यासाठी गुगल शिटला नोंद न करणे, अशा बाबी अनेक कर्मचाऱ्यांकडून होत आहे. टेबल सोडून कार्यालयाबाहेर बराच वेळ घालवत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेले आहे.
गुगल शिटमध्ये नोंद महत्वाची
कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक थम केल्यानंतर गुगल शिटमध्ये नोंद करणे गरजेचे आहे. त्याचा अहवाल दरदिवशी खातेप्रमुखांकडून नियमित दिला जात आहे.
–अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

News Story Feeds