रत्नागिरी : एकेकाळी घरातील प्रत्येक कोपऱ्यात टेबल किंवा भिंतीवर आपले अधिराज्य गाजविणारा लॅण्डलाइन आता इतिहास जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेली 20 वर्षे भारत दूरसंचार निगम लि. (बीएसएनएल) ही तोट्यातील एक्स्चेंज चालवित आहे. मात्र, आता ते न पेलणारे असल्याने जिल्ह्यातील 90 एक्स्चेंज बंद करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील उरलेल्या 7 हजार लॅण्डलाइनची ट्रिंग-ट्रिंग बंद पडणार आहे.
दहा ते पंधरा वर्षांपूर्वी लॅण्डलाइनला प्रतिष्ठेचे दिवस होते. शहरी भागात इमारत, एखाद्या चाळीत किंवा ग्रामीण भागात क्वचित लॅण्डलाइन असायचा. त्यानंतर एसटीडी, कॉइन बॉक्सच्या माध्यामातून राज्य आणि देशात विविध भागांमध्ये हे दूरध्वनी पोचले. शासनाने कालांतराने काही धोरणात्मक निर्णय घेऊन दूरध्वनी सर्वसामान्यांना परवडेल, अशी ही सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये खासगी कंपन्यांनाही सहभागी करून घेतले. या क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढल्याने दर कमी होऊ लागले.
हेही वाचा– सावधान ! पर्यटक व्यावसायिकांना बसणार हा झटका
80 हजार दूरध्वनी लोप पावणार
दूरध्वनी नोंदणी केल्यानंतर काही तासात घरामध्ये बसवून दिला जाऊ लागला. त्यामुळे या दूरध्वनीची संख्या झपाट्याने वाढली. मात्र, मोबाईल क्रांतीने संदेश दळणवळण सोपे झाले. त्यामुळे लॅण्डलाइनची संख्या घटत गेली. जिल्ह्यात बीएसएनएलचे सुमारे 80 हजार दूरध्वनीधारक होते. काही वर्षानंतर ही संख्या कमी कमी होत गेली. बीएसएनएलला एक्स्चेंज चालविताना अनेक अडचणी येऊ लागल्या. उत्पन्नापेक्षा देखभाल दुरुस्तीवर अधिक खर्च होऊ लागला. तोट्यामध्येच ही एक्स्चेंज चालविण्यास बीएसएनएलला भाग पडले.
हेही वाचा– मुलींनो, आता स्वसंरक्षण शिका नाहीतर…
पर्याय काढण्याच्या तयारीत
दरम्यान, तोट्यात चालणारी जिल्ह्यातील 90 एस्क्चेंज बंद करण्यात यावीत, असा प्रस्ताव बीएसएनएलच्या येथील प्रधान कार्यालयाने शासनाला दिला आहे. या सर्व एक्स्चेंजवर सुमारे 80 ते 10 हजार लॅण्डलाईन आहेत. एक्स्चेंज बंद झाल्यास त्याची सेवा बंद पडणार आहे. मात्र, बीएसएनएल त्यावर पर्याय काढण्याच्या तयारीत आहे.
हेही वाचा– खेडच्या भूमीवर पाय ठेवला अन् ; तीला जग जिंकल्याचा आनंद झाला…
दुर्गम भागात लॅण्डलाइनला अजूनही मागणी
जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार अनेक वाड्या-वस्त्या दुर्गम भागात आहेत. त्याठिकाणी अजून मोबाईल सेवा नाही. या भागातून मात्र अजून लॅण्डलाइनसाठी मागणी आहे. “बीएसएनएल’कडून त्याला तत्काळ सेवा देण्याचे काम सुरू आहे. मात्र, 70 ते 80 टक्के कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने या कामावरही परिणाम झाला आहे.

News Story Feeds