सावंतवाडी ( सिंधुदुर्ग) – सिंधुदुर्गात शासकीय महाविद्यालय झाले पाहिजे. अद्ययावत लॅब आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही येथे होणे गरजेचे आहे. आम्ही ते करू अशी घोषणा दोन वर्षापुर्वी वेंगुर्ले येथील रुग्णालयाच्या भुमिपुजनच्या कार्यक्रमात विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. वैद्यकिय महाविद्यालय कृतीसमितीच्या पाठपुराव्यामुळे कागदोपत्री कामकाज झाले तरी निधीअभावी घोडे अडले आहे.
उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री म्हणुन पुन्हा एकदा जिल्ह्यात येत आहेत. शिवसेनेला साथ देणारा आणि आरोग्यपासून वंचित असलेल्या सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची घोषणा करुन आश्वासन म्हणून दिलेला शब्द आता तरी पाळतील का ? असा प्रश्न सर्वसामान्याना पडला आहे.
सिंधुदुर्गात अपघातांचे तसेच माकडताप, डेंगी, लेप्टोच्या तापसरीचे वाढते प्रमाण पहाता तालुकास्तरावर कोणत्याही प्रकारचे सर्व सोयी सुविधा पुरविणारे रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे अनेक नागरीकांना बळी पडावे लागले आहे. सद्यस्थिती पहाता आधीचीच स्थिती आताही कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला देवगड, कणकवली, वैभववाडी या तालुक्यातील रुग्णांना आपत्कालीन अवस्थेत कोल्हापूर येथे तर कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील रुग्णांना गोवा बांबुळी येथील रुग्णालयावर अवलंबुन रहावे लागते.
कोल्हापूर, गोवा बांबुळी येथे रुग्णांना नेतात बऱ्याचदा वाटेतच प्राण सोडावे लागतात. यासाठी एकाच छताखाली रुग्णाना सर्व सुविधांनी असे औषधोपचार मिळावेत, यासाठी एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे. तसे झाल्यास सुसज्ज रूग्णालय व इतर सुविधांबरोबच तज्ञ डॉक्टरही उपलब्ध होणार आहेत. यासाठी सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती स्थापन होऊन गेली दोन वर्षे मागणीचा पाठपुरावा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठरावही शासनापर्यंत पोहोचले आहेत.
या पार्श्वभूमिवर राज्यात वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन विभाग अधिपत्याखाली वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृती समिती बनविण्याचे आदेशाची घोषणा जुलै 2019 च्या पावसाळी अधिवेशनात झाली होती. दरम्यान सिंधुदुर्गात वैद्यकिय महाविद्यालय व्हावे यासाठी येथील प्रांत कार्यालयासमोर वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीकडून लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले होते.
कृती समितीकडून आपला संघर्ष सुरुच होता. त्यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सावंतवाडी, दोडामार्ग, वेगुंर्ले आदी तालुके व माणगाव खोऱ्यातील तब्बल 25 हजार नागरीकांच्या माध्यमातून पत्रेही पाठविण्यात आली होती. याच भागातील तब्बल 126 ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत तर 3 पंचायत समिती आणि 3 नगरपालिकेतीलही सभेमध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्याबाबत ठरावही घेण्यात आले होते; मात्र शासनाकडून घोषणा झाली असली तरी त्याला ठोस निर्णयाची अजूनही प्रतिक्षा आहे. दोन वर्षापुर्वीच विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे वेंगुर्ले येथे एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे असे सांगत यासाठी शिवसेना ताकद लावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
प्राधान्य मिळणार का ?
उपलब्ध माहितीनुसार नंदुरबार, सातारा, सिंधुदुर्ग, परभणी, बुलढाणा, अमरावती आणि नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित आहेत. यंदा यातील काही मोजक्या ठिकाणीच मंजूरी मिळणार आहे. यात सिंधुदुर्गाचा नंबर लागणार का हा प्रश्न आहे. यात खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांची भुमिका महत्वाची आहे.
सकाळने केला पाठपुरावा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून सिंधुदुर्गाचा आरोग्य प्रश्न बऱ्यापैकी सोडवता येईल. ही संकल्पना सगळ्यात आधी सकाळने मांडली. पुढे याला वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीने उभारलेल्या चळवळीचे बळ मिळाले. पुढेही सकाळने या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा केला.

News Story Feeds