ओटवणे ( सिंधुदुर्ग ) – तांबोळी चाफेवाडी येथे जखमी खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान देण्यात आले. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे हे खवले मांजर जखमी झाले होते.
तांबोळी चाफेवाडी येथील नवीन सावंत यांच्या घरानजीक असलेल्या पडवीत खवले मांजराचे पिल्लू आढळून आले. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी या पिल्लाने पडविचा आसरा घेतला. या पिल्लावर कुत्र्याने झडप घातल्याने जखमी अवस्थेतील पिल्लू पडवीतच भयभीत स्थितीत थांबले. कुत्रांच्या भुकण्याने नवीन सावंत यांना संशय आल्याने पडवीत पाहणी केली असता खवले मांजराचे पिल्लू आढळून आले.
प्रथमतः नवीन यांनी कुत्र्यांच्या तावडीतून पिल्लाला सोडवून जीवदान दिले. त्यानंतर त्यांनी सावंतवाडी वनविभागाची संपर्क साधून याबाबत माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी अनिल मेस्त्री, वनपाल संतोष गोजारे, वनरक्षक, संतोष मोरे, वनरक्षक व्ही. एन. मांजरेकर, आत्माराम सावंत हे वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी पिल्लावर प्राथमिक औषध उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. तांबोळी गांव म्हणजे ओटवणे दशक्रोशीतील. सह्याद्री पट्ट्यात पट्टेरी वाघाबरोबरच अलीकडच्या काही दिवसात खवले मांजर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

News Story Feeds