पिंपरी – खोदाई सुरु असताना एमएनजीएल पाईपलाईनमधून (MNGl Pipeline) गॅस लिकेज (Gas leakage) झाल्याने आग (Fire) लागली. या आगीत रस्त्यावर उभ्या असलेल्या चार मोटारी (Motor Fire) जळाल्या. ही घटना नवी सांगवीतील (Sangavi) मयूरनगरी येथे घडली. (Four cars caught fire due to gas leakage)

मयूरनगरी येथील रस्त्यावर मंगळवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास खोदाई सुरु होती. त्यावेळी एमएनजीएलची गॅस पाईपलाईन फुटली. त्यातून गॅस बाहेर पडला गॅसने पेट घेतला. दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या चार मोटारींना आग लागली. काही क्षणातच आग पसरल्याने मोटारींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. रहिवासी भागात ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Vehicle

घटनेची माहिती मिळताच पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्राच्या दोन व रहाटणी उपकेंद्राची एक अशा तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

Esakal

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here