मुंबई – अभिनेत्री कंगणाची ( Kangana Ranaut) टिवटिव सगळ्यांना माहिती आहे. तिच्या वाचाळपणाबद्दल ती प्रसिध्द आहे. तिनं गेल्या काही दिवसांपूर्वी जी वादग्रस्त वक्तव्यं केली होती त्यामुळे ती चर्चेत आली होती. व्टिटरनं तिचे अकाऊंट सस्पेंड केलं आहे. त्याला कारणही तसचं आहे. पश्चिम बंगालमध्ये (West bengal election) निवडणूकांच्या निकालानंतर जो गोंधळ उडाला त्यात कंगणानं काही धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्यं केली होती. तिच्या त्या चिथावणीखोर स्वभावामुळे तिचं व्टिटरच्या (Twitter account suspended) अकाऊंटला बंद करण्यात आले होते. मात्र असे होऊनही ती गप्प बसलेली नाही.

कंगणासाठी ( Kangana Ranaut) कुठलाही विषय वर्ज्य नाही. सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणे तिला जमले आहे. त्यामुळे बातमीचा विषय कंगणाभोवतीच असतो. ती कुणावरही बोलत असते. राजकीय नेते, बॉलीवूड सेलिब्रेटी यांच्यावर ती टीका करत असते. तिला ते आवडते. आणि वादाचा सामना ती व्टिटच्या माध्यमातून करत असते. दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाच्या वेळी तिनं घेतलेली भूमिका सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ती सर्वांच्या टीकेचा विषयही झाली होती. मात्र त्याचा काही एक परिणाम कंगणावर होत नाही.

actress kangana post

Also Read: इम्रान खान यांच्याशी रेखा करणार होती लग्न, पण..

Also Read: ‘रुके न तू, झुके न तू’; वडिलांची कविता म्हणत बिग बींनी दिली प्रेरणा

राजकीय वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत राहणे कंगणाला जमतं. (politically and religion issue) अजूनही कंगणा वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ती बोलत आहे. व्टिटरनंतर तिनं इंस्टावर आपली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. तिनं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविषयी एक प्रतिक्रिया दिली आहे. कंगणानं जो फोटो इंस्टावर पोस्ट केला आहे त्यात टीएससीचा एक नेता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. तिनं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, राक्षसी ताडका, सत्तेच्या चरणी नतमस्तक. कंगणाची ही पोस्ट वेगानं व्हायरल होत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here