मुंबई – अभिनेत्री पूजा बेदी (pooja bedi ) बॉलीवूडमधील प्रसिध्द नाव. ती आपल्या बोल्डनेस (Boldness) बद्दल प्रख्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये सक्रिय नसलेली पूजा सोशल मीडियावर मात्र चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. तिचं फोटोशुट नेहमी सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. आताही तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला नेहमीप्रमाणे तिच्या चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
नुकताच पूजाचा वाढदिवस होऊन गेला. ती आपल्या चित्रपटांशिवाय तिच्या बोल्डनेससाठी चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. याशिवाय कुठल्याही गोष्टींवर सडेतो़डपणे मतं व्यक्त करण्यासाठी पूजा आघाडीवर असते.

1991 मध्ये तिनं विषकन्या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिची खरी ओळख झाली ते आमिर खानच्या (Amir Khan movie jo jeeta wahi sikandar) जो जिता वही सिकंदर या चित्रपटापासून.

जो जिता वही सिकंदर या चित्रपटामध्ये तिनं एका बोल्ड मुलीची भूमिका केली होती. त्यानंतर तिनं फिर तेरी कहानी याद आए, आतंक ही आतंक आणि शक्ति सारख्या चित्रपटांधून ती झळकली होती.


पूजानं चित्रपटांशिवाय काही जाहिरांतीमध्येही काम केलं आहे. 90 च्या दशकात तिनं एक बोल्ड जाहिरांतीमध्येही काम केले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती. ती जाहिरात इतकी बोल्ड होती की त्यावेळी दुरदर्शननं ती जाहिरात प्रसारित करण्यास नकार दिला होता. यावेळी ती मार्क रॉबिन्सन नावाच्या मॉडेलबरोबर दिसली होती.

Also Read: दरवेळी ईदचीच ‘कमिटमेंट’ का? सलमानचं ‘टॉप सिक्रेट’
Also Read: वय नावाला, सलमानची कमी वयाच्या अभिनेत्रींसोबतची ‘केमिस्ट्री’
पूजानं काही रियॅलिटी शो मध्येही काम केले आहे. त्यात तिचा सहभाग महत्वाचा होता तर डान्स रियॅलिटी शो – झलक दिख लाजा, बिग बॉस सीझन 5, नच बलिए 3 आणि खतरो के खिलाडी मध्येही ती झळकली होती.
Esakal