अंबाजोगाई (जि.बीड) : आम्ही कंटाळलो नाहीत, भीतही नाहीत. आणखीही हे पुण्यकर्म करु. पण, ज्यांच्या घरातला व्यक्ती जातो त्यांच्या वेदनांची जाणीव त्यांनाच. देवाने आता तरी हे तांडव थांबवावे, अशी आर्त हाक देताहेत कोविडमुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या (Last Ritual On Dead Corona Patient) मृतदेहांवर काम करणारे सांगतात. अंबाजोगाईत (Ambajogai) त्यांनी वर्षभरात सातशे चिता रचल्या आहेत. त्यातील रणधीर सोनवणे याची ही भावना सर्वकाही सांगून जाते. कोविडच्या संसर्गात (Corona Infection) पॉझिटीव्ह शब्द ऐकला तरी लोक दुर जात. अनेक जण दूर जातात, एवढी भिती या आजाराची पसरली आहे. अशा परिस्थितीत न थकता कोविडच्या मृतदेहांवर प्रत्यक्ष अंत्यसंस्कार करणे किती अवघड, जिकरीचे आणि भितीचे काम आहे. मात्र, शहरात पालिकेच्या (Ambajogai Municipal Council) कोविड कर्मचाऱ्यांनी ७०० मृतदेहांच्या चिता रचून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. जिल्ह्यातील एकमेव वैद्यकीय महाविद्यालय असल्याने या ठिकाणी गंभीर रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कधी-कधी तर एकाच दिवशी ३० पेक्षा जास्त मृतांवर अंत्यसंस्कार (Cremation) करण्याची वेळही यांच्यावर आली. (Ambajogai Municipal Council Workers Do Cremation Of Covid Patients)

Also Read: मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा, हरिभाऊ बागडेंची मागणी

कुठलीही सुटी न घेता, सकाळपासून सुरू झालेले हे काम रात्रीपर्यंत सुरू असते. कधी तर पहाटेही होते. सध्या उन्हाळ्याचा कडाका असताना भर दुपारी उन्हात, पावसात, थंडीतही या त्यांचे हे काम न थकता सुरूच आहे. पथकाचा प्रमुख पदवीचे शिक्षण घेतलेला रणधीर सोनवणे आहे. रणधीर सांगतो, ‘सुरूवातीला भिती वाटायची, त्यामुळे सहकाऱ्यांना काम सांगून लांब थांबायचे. परंतू आता त्या कामात नजर मेल्याने भिती दूर झाली’. पूर्वी रात्री झोपही लागत नव्हती. अंत्यसंस्कार झालेल्या व्यक्तीचा देह उघडा तर पडला नसेल ना अशी स्वप्न पडायची. काही राहून गेले की काय? असे जरी वाटले तरी प्रत्यक्ष तो खात्री करून घेण्यासाठी मध्यरात्री थेट गाडी घेऊन निघायचो. प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व मुख्याधिकारी श्री. साबळे यांचे नेहमी पाठबळ असते. त्यामुळे अडचणी येत नसल्याचे असे रणधीर सोनवणे यांनी सांगितले.

Also Read: औरंगाबादकरांनो मुलांची काळजी घ्या! २६ बालके कोरोनाबाधित

किमान त्यांची तेवढी अपेक्षा तरी…

आम्ही झोकून देऊन काम करत असल्याचे समाधान असले तरी ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली त्यांचे दु:ख मोजणे अशक्य आहे. नातेवाईकांना अंत्यसंस्काराचे सर्व नियम पाळूनच कोविड मृतांवर अंत्यसंस्कार व्हावेत ही अपेक्षा असते. नातेवाईक अग्नी देऊ देण्याची विनंती करतात. तेंव्हा त्यांच्या समाधानासाठी किट घालून त्यांना हा अग्नीचा विधी करू दिला जातो. काही जण फोटो काढतात, व्हिडिओ शुट करण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी दु:खात असतात. त्यामुळे त्यांना बोलता येत नाही. तरीही त्यांना काही बंधने असल्याचे प्रेमाने सांगावे लागते.

अंत्यसंस्कार करणारे माणसं

रणधीरसह त्यांचे सहकारी अनिकेत साठे, बाबूराव आव्हाडे, लक्ष्मण जोगदंड, बाबासाहेब गणपत आव्हाडे, मारुती धोंडीराम चव्हाण, सुमेर काळे, शेख रहीम, जावेद शेख यांचा सहभाग असतो.यातील सुमेर हा तर केवळ २३ वर्षांचा आहे. चेहऱ्यावर कुठलाही त्रागा न करता हे आपल्या कामात व्यस्त असतात. दुपारच्या रणरणत्या उन्हातही चितेची धग हे कसे सहन करत असतील ती कल्पना करणेच अवघड आहे.

बेवारस मृतांना अग्नी देणारा अवलिया

अंबाजोगाईत मुक्तार शेख हे एक कमालीचे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करणे हा त्याने घेतलेला वसाच आहे. मागील पंधरा वर्षांत त्याने ११० बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यात सर्वधर्मांच्या मृतांचा समावेश आहे. कोविडने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेच्या टीमलाही तो मदत करतो. इतकेच नव्हे, तर स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना नोंदणी करून डॉक्टरपर्यंत पोहचवणे, औषधोपचारासाठी पैसे नसतील तर मदत करणे, माणसांबरोबरच पशुपक्ष्यांनाही आधार देणे, त्यांना चारा व पाणी देणे, खुप झाले आता फक्त एकच करा माणसांनी माणुसकी जपली पाहीजे, संत महात्म्यांनी सांगुन सुद्धा माणुसकी का हरवत चालली आहे. याचीच चिंता शेख मुक्तार यांनी व्यक्त केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here