बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ अर्थात सनी लिओनीचा आज ४०वा वाढदिवस
सनीचा जन्म १३ मे १९८१ रोजी कॅनडा येथे झाला.
सनी लिओनी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी चर्चेत असते.
बॉलिवूडमध्ये काम करण्याआधी सनी अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये आयटम साँग करण्यास सुरूवात केली.
२०१२ मध्ये सनीने ‘जिस्म-२’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सनीचा बॉलिवूडपर्यंतचा हा प्रवास तिच्या ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी’ या तिच्या जीवनपटामध्ये दाखवला आहे.
सनीने २०११ मध्ये डॅनियल वेबरसोबत लग्न केले. सनी आणि डॅनियलने निशा नावाच्या मुलीला दत्तक घेतले.
त्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून सनीला जुळी मुलं झाली.
सनी नेहमीच सोशल मीडियावर आपल्या मुलांसोबतचे अनेक फोटो शेअर करते.
सनीच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here