‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत ‘टप्पू’ची Tapu भूमिका साकारलेला अभिनेता भव्य गांधी Bhavya Gandhi याच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं. गेल्या दहा दिवसांपासून ते रुग्णालयात कोरोनाशी झुंज होते. मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाह Samay Shah याने विनोद गांधी यांचा फोटो पोस्ट करत त्यांच्यासाठी भावनिक कविता लिहिली. समयची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Samay Shah pays tribute to Bhavya Gandhi father)

‘जिसके साथ होता वो ही समझता’ (ज्याच्यासोबत घडतं, त्यालाचं त्याचं दु:ख कळतं) , असं त्याने कवितेच्या सुरुवातीला लिहिलंय. या कवितेतून समयने भव्यच्या भावना व्यक्त केल्या. भव्य आणि समय हे फक्त सहकलाकार नसून चुलत भावंडंसुद्धा आहेत.

हेही वाचा : वीना मलिककडून यहुदींवरील अत्याचाराचं समर्थन; ट्विट केलं हिटलरचं विधान

विनोद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासाठी हॉस्पिटल बेड शोधण्यासाठीही त्यांना फार काळ लागला होता. याबाबत भव्यची आई यशोदा गांधी ‘स्पॉटबॉय ई’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, ‘विनोद यांना ताप होता आणि त्यांच्या छातीतही दुखत होतं. चाचण्या आणि स्कॅन केल्यानंतर ५ टक्के संसर्गाचं निदान झालं. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांना घरीच विलगीकरणात ठेवलं होतं. पण हळूहळू त्यांची तब्येत ढासळत गेली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.’

विनोद गांधी यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा आणि निश्चित, भव्य ही दोन मुलं असा परिवार आहे. भव्यच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्ताने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here