भारतात सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन असा दोन लशींचे डोस दिले जात आहेत.कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशील्डची किंमत केंद्रासाठी एकच आहे. मात्र राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयासाठी या दोन्हीचे दर वेगवेगळे आहेत.कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सिन लशीच्या दोन डोसमध्ये किमान 28 दिवसांचा कालावधी आहे. कोविशील्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिन लस जास्त प्रभावी आहे.सध्या केंद्राकडून 18 वर्षावरील लोकांसाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र काही राज्यांनी डोस कमी असल्यानं यामध्ये असमर्थ असल्याचं म्हटलं आहे.