‘रेगे’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळवणारा अभिनेता आरोह वेलणकर याने नुकतंच त्याच्या मुलाचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘अर्जुन, बाबाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे’, असं कॅप्शन देत आरोहने हा फोटो पोस्ट केला आहे. २ मार्च रोजी आरोहची पत्नी अंकिता हिने मुलाला जन्म दिला. आरोह आणि अंकिता जवळपास तीन वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले. आरोहचं हे लव्ह मॅरेज असून कॉलेजमध्ये त्याची आणि अंकिताची पहिली भेट झाली होती. आरोहने प्रवीण तरडे लिखित ‘रेगे’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केल्यानंतर आरोहने ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.