छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत राहणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे इंडियन आयडॉल. सध्या शोचं १२ वं पर्व (indian idol 12) सुरु असून यात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने श्रोत्यांच्या मनावर भूरळ घातली आहे. या सगळ्यांमध्ये लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत राहणारी स्पर्धक म्हणजे सायली कांबळे (sayli kamble). गोड आवाजासोबतच सायली अनेकदा तिच्या कुटुंबामुळेही चर्चेत असते. यावेळीदेखील सायली तिच्या आईमुळे चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे या शोच्या मंचावर सायलीने तिच्या आईला (mother) एक खास महाराष्ट्रीयन वस्तू भेट दिली आहे. (indian idol 12 contestant sayli kamble gifts a saree to her mother during mothers day celebration)

अलिकडेच झालेल्या भागात सायलीने तिच्या आईला चक्क पैठणी गिफ्ट दिली आहे. विशेष म्हणजे सायलीने तिच्या स्व कष्टातून ही भेट दिल्याचं तिने सांगितलं. मौसम ऑसममध्ये मिळालेली बक्षीसे, परिक्षक व वादक यांनी दिलेल्या भेटी या सगळ्यांमधून पैसे जमा करुन तिने तिच्या आईसाठी पैठणी घेतली आहे.

Also Read: टॉन्सिल्स शस्त्रक्रियेनंतर बदलली महिलेची भाषा?

“माझ्या आईचे आशीर्वाद कायम माझ्या पाठिशी आहेत. इंडियन आयडॉलच्या या प्रवासात ती सतत माझ्यासोबत होती. कायम माझ्या आणि माझ्या वडिलांच्या गरजांकडे तिने लक्ष दिलं. सतत आमचा विचार करते. त्यामुळे मी खरंच तिची आणि देवाची ऋणी आहे. प्रत्येक मौसम ऑसनंतर मला येथील वादकांकडून कौतुकास्पद बक्षिसं मिळाली. त्यातील पैसे वाचवून मी ही पैठणी घेतली आहे, असं सायली म्हणाली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here