नवी दिल्ली – कोरोनाच्या संसर्गाने (Coronavirus) गावांना (Village) कवेत घ्यायला सुरुवात केल्याने राज्यांच्या (State) चिंता (Anxiety) वाढल्या आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची (Patient) संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर (Health System) देखील ताण येतो आहे. शहरांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या संसर्गाला गावांच्या वेशीवर रोखण्यासाठी देशभरातील राज्यांनी कंबर कसली असून गावांनीही काटेकोर उपाययोजना आखण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसते. (village decided to stop Corona)

अनेक ठिकाणांवर आता पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून लॉकडाउन केला जात असून स्थलांतरित कामगारांचा डेटा संकलित करण्याचे काम देखील सुरू झाले आहे. आजारी लोकांना दूरध्वनीवरून मोफत सल्ला देण्याच्या कामालाही वेग आला आहे. विविध राज्ये केंद्र सरकारच्या सल्ल्यानेच स्थानिक पातळीवर नव्याने निर्बंध लागू करत आहे.गुजरातेत पंचायतराज संस्थांकडून स्थलांतरितांच्या माहितीचे संकलन केले जात असून बाहेरून गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवली जात आहे. आसाममध्ये देखील तोच कित्ता गिरवला जात आहे.
Also Read: गंगेत तरंगत्या मृतदेहांबाबत युपी-बिहारला मानवी हक्क आयोगाची नोटीस
बाहेरून येणाऱ्या प्रत्येकावर स्थानिक यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवते आहे. हिमाचल सरकारने आजारी लोकांना मोफत ऑनलाइन वैद्यकीय सल्ला देण्यासाठी ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू केली आहे. केरळ सरकारने कुटुंबश्री कम्युनिटी नेटवर्कची उभारणी केली असून यासाठी सामाजिक विकास सोसायट्यांची मदत घेतली जात आहे. याचा मोठा लाभ गरीब महिलांना होताना दिसतो. केरळ सरकारने विविध ग्रामपंचायतींना रुग्णवाहिका द्यायला सुरुवात केली असून याशिवाय गरजूंसाठी दोन कार आणि ऑटोरिक्षाही दिल्या जात आहेत.
बिहार, महाराष्ट्र सावध
बिहार सरकारने सर्वच कुटुंबांना मोफत वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून स्थानिकांनाच मास्क निर्मितीचे काम दिले जात आहे. महाराष्ट्रातही ‘माझे कुटुंब,माझे जबाबदारी’च्या माध्यमातून कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
Esakal