मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना म्हणजे रमजान. या महिन्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक मुस्लीम बांधव रोजा (roza) करतात. या काळात संपूर्ण दिवसभर ते अन्न किंवा पाण्याचा एक थेंबही घेत नाही. केवळ पाणीच कशाला ते थुंकूदेखील गिळत नाहीत. संपूर्ण दिवसभर ते कडक रोजा करतात. विशेष म्हणजे मुस्लीम बांधवांप्रमाणेच अन्य जाती-धर्मातील काही जणदेखील रोजा करतात. यामध्येच सध्या इंडियन आयडॉल १२ (indian idol 12 ) चा स्पर्धक आशिष कुलकर्णी याची चर्चा रंगली आहे. आशिषने एक दिवस कडक रोजा केला होता. त्याने स्वत: इंडियन आयडॉलच्या सेटवर याविषयी खुलासा केला आहे. (indian idol 12 contestent-Ashish-Kulkarni-kept-roza-for-a-day-article1)
Also Read: मिरची चिरल्यानंतर हाताची जळजळ होते? मग ‘हे’ उपाय नक्की करा
सध्या सोशल मीडियावर ‘इंडियन आयडॉल १२’ चा एक प्रोमो चर्चेत येत असून या कार्यक्रमात ईद स्पेशल भागाचं आयोजन करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. या भागात आशिषने ‘मुबारक ईद मुबारक’ आणि ‘नूर-ए-खुदा’ ही दोन गाणी सादर केली. सोबतच त्याने खास दानिशसाठी रोजा केल्याचंही सांगितलं.
“मी खास दानिशसाठी एक दिवस रोजा केला आहे. या संपूर्ण दिवसभरात मी दानिशसोबतच होतो. त्याने या काळात मला रोजा आणि त्यामागचं कारण व इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या. हा दिवस माझ्यासाठी खरंच चांगला होता. मी या संपूर्ण दिवसात केवळ देवाचा विचार केला, ज्यामुळे मला मन:शांती मिळाल्यासारखं वाटतंय”, असं आशिषने सांगितलं.

दरम्यान, आशिषचा परफॉर्मन्स झाल्यानंतर दानिश मोहम्मदने आशिषचा रोजा सोडवला. त्यामुळे सध्या आशिष आणि दानिश या दोघांच्या मैत्रीची जोरदार चर्चा सुरु आहे.
Esakal