अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला १ हजार १११ आंब्याचा नैवेद्यमंदिराच्या गाभाऱ्यात केशरी- पिवळा झेंडू, जरबेरा आदी फुलांची सजावट केली होती.अक्षय तृतीयेला दरवर्षी मंदिरात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आरास आणि पुष्परचना करण्यात येते. मात्र, यावर्षी कोविडच्या पार्श्र्वभूमीवर अत्यंत साधेपणाने ही आरास करण्यात आली.देसाई बंधू आंबेवाले चे मंदार देसाई यांनी दरवर्षीप्रमाणे आंबे देऊन श्री चरणी सेवा अर्पण केली.