मुंबई – कोरोनाच्या कहर वाढतो आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्याला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन लढा देण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्यात आले आहे. युपीमध्येही (Uttarpradesh) मात्र सध्या तो आटोक्यात आला आहे, त्याचे कारण म्हणजे तिथे योगी आदित्यनाथ आहेत. असे विधान करणारे अभिनेते गजेंद्र चौहान (Gajendra Chauhan ) भोव-यात सापडले आहे. gajendra chauhan coronas conditions better in up yogiji the defender of hindu

चौहान (Gajendra Chauhan ) यांनी एकापाठोपाठ व्टिट करुन योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे समर्थन केले आहे. ते हिंदू धर्माचे रक्षक आहेत. त्यामुळे त्यांनी युपीमधील परिस्थिती नियंत्रणात आहे अशा आशयाचे विधान चौहान यांनी केल्यानं ते ट्रोल होत आहेत. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी केले होते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची काळजी घेण्याचे आवाहन वेगवेगळ्या राज्यातील प्रशासकीय यंत्रणांवर आहे. मात्र कोरोनाबाधितांचा आकडा काही कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे.

gajendra post

देशात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक बिकट अवस्था युपीमध्ये असल्याची चर्चा आहे. त्या राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि औषधे यांचा तुटवडा असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यावरुन सरकारला धारेवर धरले जात आहे. त्यांना प्रश्नही विचारले जात आहेत. यासगळ्या पार्श्वभूमीवर गजेंद्र चौहान यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बाजू घेतली आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी चौहान यांनी अनेक व्टिट केले आहेत.

Also Read: नवी मालिका ‘बायको अशी हव्वी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Also Read: ‘नवरा कसा हवा?’; चाहत्याच्या प्रश्नावर गौतमी देशपांडेचं भन्नाट उत्तर

चौहान यांनी लिहिले आहे की, योगीजी केवळ मुख्यमंत्रीच नाही तर हिंदू धर्माचे रक्षकही आहेत. सगळा देश त्यांना पसंत करतो. अशाप्रकारचे व्टिट केल्यानंतर चौहान ट्रोल झाले आहेत. देशात कुठले राज्य कोरोनाच्या बाबत सर्वाधिक सुरक्षित आहे असा प्रश्न जर विचारला गेला तर मला युपीचे नाव सांगावे लागेल. याचे कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. या शब्दांत त्यांनी योगींचे कौतूक केले होते.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here