चिखली (जि.बुलडाणा) : एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 10 च्यावर खासगी कोविड सेंटर बंद (Private Covid Center closed) करण्याचा तज्ज्ञ डॉक्टरांनी (Doctors) सामुहिक निर्णय घेतल्यामुळे येथे दाखल असलेल्या रुग्णांचे काय असा सवाल आता निर्माण झाला आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr.Rajendra Shingne) यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून, यावर आता प्रशासन काय भूमिका घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Decision to close ten private covid centers at Chikhali in Buldana district

remdesivir injection

स्थानिक वाढता राजकीय हस्तक्षेपामुळे, ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा या अन्य बाबींमुळे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे कारण पुढे करीत शहरातील खाजगी कोवीड रूग्णालयातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Also Read: पॉझिटिव्ह रुग्ण २४ तासात झाला निगेटिव्ह!

जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांना दिलेल्या अर्जात नमूद करण्यात आले की, सेवाकार्यात सततचा स्थानिक राजकीय हस्तक्षेप, ऑक्सिजन व रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा या बाबींमुळे मानसिक खच्चीकरण होत असून त्याचा मानसिक त्रास होत असल्यामुळे कोवीड सेंटर चालविण्यास असमर्थ असल्याचे सांगत त्याकारणामुळे सर्व जणांनी सामुहिक राजीनामे दिले असून ते मंजूर करण्याची विनंती कर्णयात आली आहे.

Also Read: कोरोनाचा धोका; १४ दिवसांत दीडशेवर बळी!

Covid Center

निवेदनावर योगीराज हॉस्पिटल, सावजी हॉस्पिटल, खंडागळे हॉस्पिटल, पानगोळे हॉस्पिटल, गुरूकृपा हॉस्पिटल,, दळवी हॉस्पिटल, तुळजाई हॉस्पिटल, गंगाई हॉस्पिटल, तायडे हॉस्पिटल, जैस्वाल हॉस्पिटलच्या संचालकांच्या स्वाक्षर्‍या असून डॉक्टरांच्या या निवेदनावर पालकमंत्री कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

Also Read: आरोग्य यंत्रणा हादरली; ‘म्युकर मासोसीस’मुळे महिलेचा झाला मृत्यू

कारण जाणुन घेणे गरजेचे

खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार करणार्‍या रुग्णांचा आता डॉक्टरांच्या या निर्णयामुळे पेच निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने खरच राजकीय हस्तक्षेप आहे का अजून काही याबाबत सखोल चौकशी करुन परिस्थिती हाताळणे गरजेचे झाले आहे.

संपादन – विवेक मेतकर

Decision to close ten private covid centers at Chikhali in Buldana district

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here