अकोला : राजराजेश्वर मंदिर (Raj-rajeshvar Tempal) परिसरात मांडेकर परिवारातील (Mandekar Family) पाच भावंडे ९६ वर्षीय रमाबाई मांडेकर यांच्या छायेत संयुक्त कुंटुंबाचा (Joint family) डोलारा सांभाळीत आहेत. कुटुंबातील दुसरे बुजूर्ग व्यक्तिमत्त्व असणारे ७६ वर्षीय महादेवराव मांडेकर यांच्या नेतृत्वात परिवारातील सर्व सदस्य आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडीत आहेत. Mandekar family in Akola is cultivating joint family system!

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता हा परिवार सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कोरोना प्रादुर्भावापासून सर्वांचीच मुक्तता व्हावी यासाठी दररोज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनाचे गायन, चिंतन करीत सात्विक भावनेने हे राष्ट्रीय संकट दूर करण्याची देवाकडे नियमित याचना करीत आहे. घरात वावरतानाही कोरोनाचे सर्व नियम पाळले जात असल्यामुळे या संयुक्त कुटूंबात गेल्या चौदा महिन्यांमध्ये कोरोनाला शिरकाव करता आलेला नाही.

परिवारातील पुरूषोत्तम आणि गोपाल हे घराण्यातील व्यापारी व्यवसाय व शेती पाहतात. रामदास त्यांना मदतीचे कार्य करीत आहे. धाकटा ज्ञानेश्वर शिक्षण क्षेत्रात कार्य करीत आपल्या अनुभवाच्या बळावर कुटुंबाच्या सर्वस्तरीय कार्याला नियमित उजाळा देण्याचे काम करीत असल्याचे दिसून येते.

परिवारातील महिलांचा स्नेह नियमित वृध्दिंगत व्हावा यास्तव परिवारात नियमित कार्याशिवाय सौ.लताबाई, सौ. रेणूकाबाई, सौ. सीमाताई, सौ. संध्याताई व सौ. वर्षाताई यांच्या पुढाकाराने महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमात महिलांच्या कार्याची दखल घेवून, त्यांना प्रोत्साहित करून गौरविण्यात येते. यावेळी विचारांचे आदान-प्रदान मोकळ्या पध्दतीने केले जाते.

Also Read: दिव्यांग धीरजने वाढविली भारताची उंची; वाचा काळजाचा थरकाप उडविणारा प्रवास

परिवारात सात मुलींपैकी सहा मुलींचे विवाह थाटामाटात झाले असून, त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळे स्वत:चे व त्यांच्या कुंटुंबांचे सांसारिक जीवन जबाबदारीने, कर्तव्याची जाण ठेवून पार पाडीत आहेत सोबतच मुलांच्या संगोपनासह त्यांना दिशा देण्याचे कार्य मोठ्या उत्तरदायित्वाने केले जात असल्याचा सार्थ अभिमान मांडेकर परिवाराला आहे

Also Read: स्वातंत्र्याच्या लढाईत राजेश्‍वरांच्या पायथ्यांशी घेतला होता ‘राजगुरुंनी’ विसावा

अडीअडचणी, रुसवेफुगव्यांकडे दुर्लक्ष केल्याने आनंदी वातावरण

संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेकवेळा आर्थिक अडचणी, समस्या उद्भवल्या आहेत; परंतु जीवनातील अंतिम सत्याच्या दिशेने काम करण्याचे धोरण मांडेकर परिवाराने स्वीकारले आहे. परिवाराला अपेक्षित नसलेल्या बाबी घडल्या तरी त्याकडे दुलर्क्ष करीत अडी-अडचणी व समस्यांवर मात करीत, जीवनातील कर्तव्यास प्राधान्य देत, जीवनातील चढ-उताराचा सामना आनंदी वृत्तीने करीत सर्वजण जीवनाचा आनंद उपभोगत आहेत. आजच्या परिस्थितीतही संयुक्त कुटुंबाचा वारसा सुरू ठेवून मांडेकर परिवाराने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

संपादन – विवेक मेतकर

Mandekar family in Akola is cultivating joint family system!

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here