हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री श्रिया पिळगावकरने नुकतेच एक हटके फोटोशूट केले आहे. फोटोशूटमधील श्रियाच्या लूकने नेटकऱ्यांना भुरळ पाडली आहे. या फोटोमध्ये श्रिया पांढऱ्या साडीमध्ये आणि पिवळ्या ब्लाऊजमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे.श्रियाचे हे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर अर्जुन कमाथ यांनी काढले आहेत. ‘पृथ्वीची कन्या’, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.