बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री डेझी शाहने Daisy Shah तिच्या चाहत्यांना ईदच्या Eid शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्यामध्ये डेझीने लिहिले, ‘ईदच्या सर्वांना शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात आनंद, विश्वास आणि शांती नेहमी राहो. अल्लाहचा आशिर्वाद आणि प्रेम तुमच्या सोबत नेहमी राहू दे.’ या ट्विटला रिप्लाय करत एका युजरने डेझीवर टीका केली. ‘स्वत:च्या धर्माकडे लक्ष दे’, असा सल्ला देत तिला ट्रोल केलं. त्याला डेझीने दिलेले उत्तर वाचून अनेकांनी सोशल मीडियावर तिचे कौतुक केले आहे. (Daisy Shah slams a troll for attacking her Eid post)

डेझीने ट्रोलरला उत्तर देत लिहिले, ‘माझ्या आई -वडिलांनी मला सगळ्या धर्मांचा आदर करायला शिकविले आहे. तुम्ही कदाचित हे लहाणपणी शिकायला विसरला असाल. कृपया तुमच्या वाईट विचारांचे ज्ञान दुसऱ्या कोणाला तरी जाऊन द्या.’ डेझीने दिलेल्या या उत्तराचे कौतुक करत अनेकांनी तिच्या या ट्विटला रिप्लाय दिला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, ‘ मस्त मॅडम, तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढला.’ दुसऱ्याने लिहिले, ‘ मी तुमच्या विचारांशी सहमत आहे. तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला ईदच्या शुभेच्छा.’ एका नेटकऱ्याने कमेंट करून लिहिले , ‘आपण सर्वप्रथम भारतीय आहोत.’

Also Read: ‘या’ कारणामुळे सुरेश वाडकरांनी नाकारलं होतं माधुरी दीक्षितचं स्थळ

सलमान खानचा 2014 साली प्रदर्शित झालेल्या ‘जय हो’ या चित्रपटामधून डेझीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘रेस-3’ या चित्रपटामध्ये डेझीने महत्वपूर्ण भूमिका साकारली. डेझी अनेक दिवसांपासून कोणत्याच चित्रपटांमध्ये दिसली नाही. त्याबद्दल एका मुलाखतीमध्ये बोलताना ती म्हणाली, ‘माझ्याकडे येणारा प्रत्येक प्रोजेक्ट मी स्वीकारू शकत नाही. माझ्या आवडीनुसार मी चित्रपटांची निवड करते. बॉलिवूडमध्ये मला अजून बरंच काही शिकायचं आहे.’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here