पातूर (जि.अकोला) : एमसीएल कंपनी अंतर्गत मीरा क्लीन फ्युअल प्रा. ली. या जैवइंधन व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सदर भूमीपूजन सोहळा ऑनलाइन पद्धतीने पार पडला असल्याची माहिती कंपनीचे फाउंडर डायरेक्टर छगन राठोड यांनी दिली. Now farmers in Akola will grow gas!

शिलाबाई फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे डायरेक्टर छगन राठोड यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की पातुर तालुक्यातील नायगाव येथे विदर्भातील पहिलाच बायो सीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याच्या दिशेने आपल्या कंपनीचे ही पहिले पाहून आहे डॉक्टर कलाम यांचे शिष्य आणि प्रकल्प एमसीएल इंडिया कंपनीचे संस्थापक डॉ.श्याम घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पातूर तालुक्यातील नायगाव येथे कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष दामोदर जाधव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड, पंचायत समिती सभापती लक्ष्‍मीबाई जनार्दन डाखोरे, तालुका कृषी अधिकारी धनंजय शेटे, पातुर विकास मंचचे शिवकुमार सिंह बायस ठाकूर, तसेच शिलाबाई फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे डायरेक्टर अर्चनाताई राठोड शिलाबाई राठोड या उपस्थित होत्या. या प्रकल्‍पात शेतीतील टाकाऊ कचरा, नेपियर गवत व घरगुती कचऱ्यापासून जैविक इंधन व सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे.

शिलाबाई फार्मर प्रोड्यूसर कंपनीची उद्दिष्टे

– हवेत कार्बन सोडणाऱ्या इंधनाला पर्याय असणाऱ्या जैविक इंधनाची निर्मिती

– २०२५ पर्यंत चारचाकी दुचाकी वाहने सीएनजीवर चालविणे

– दर दिवसाला शंभर टन नैसर्गिक वायू आणि १५० टन नैसर्गिक खताची निर्मिती

– सेंद्रिय उत्पादनांची साखळी तयार करणे व युवकांना रोजगार देणे

संपादन – विवेक मेतकर

Now farmers in Akola will grow gas!

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here