पुणे : राज्याबाहेरून महाराष्ट्रात मालवाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर आणि क्लीनर यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याची अट राज्य सरकारने शनिवारी रद्द केली. राज्यातील लॉकडाऊन एक जूनपर्यंत वाढविण्याचा आदेश राज्य सरकारने शुक्रवारी प्रसिद्ध केला. त्या आदेशात राज्याबाहेरून मालवाहतूक करणाऱ्या ड्रायव्हर आणि क्लीनर यांना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे वाहतूकदार संघटनांनी निदर्शनास आणले होते, तसेच ही अट तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच मालवाहतूक करणाऱ्या एका वाहनात एक ड्रायव्हर आणि एक क्लीनर यांनाच परवानगी देण्यात आली होती. मात्र लांबच्या अंतरावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनात दोन ड्रायव्हर एक क्लीनर असतात, असेही मालवाहतूक दराने राज्य सरकारच्या निदर्शनास आणले होते.

Also Read: गावातील पहिल्या जम्बो कोविड सेंटरला 24 कोटी 24 लाखाचा निधी

राज्य सरकारने या दोन्ही मुद्द्यांची दखल घेतली. त्यानुसार मालवाहतूक करणारे दोन ड्रायव्हर आणि एक क्लीनर यांना राज्यात प्रवेश करताना आरोग्य सेतू ॲपवर त्यांची प्रकृती योग्य आहे, असे सादर करायचे आहे. तसेच ड्रायव्हर आणि क्लीनर यांना कोरोनाची लक्षणे असल्यास त्यांना नजीकच्या कोरोना केंद्रावर उपचारासाठी घेऊन जावे, असेही राज्य सरकारने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या सुधारित आदेशात म्हटले आहे.

ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे कुलतरण सिंग अटवाल, बाळ मलकत सिंग आणि बाबा शिंदे यांनी राज्य सरकारच्या सुधारित निर्णयाचे स्वागत केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here