गुहागर (रत्नागिरी) : वेळणेश्वर येथे राहणारे लक्ष्मण मोरे यांच्या घरावर मंगळवारी (ता. ११) रात्री ११ च्या सुमारास मोठा दगड कोसळला. दरम्यान, घटनेआधी वीजप्रवाह खंडित झाल्याने घरातील मंडळी अंगणात होती. त्यामुळे मनुष्यहानी टळली. मात्र, स्वयंपाकघराची भिंत तोडून घरात शिरलेल्या दगडाने सुमारे ७७ हजाराचे नुकसान झाले आहे.
लक्ष्मण मोरे यांचे घर वेळणेश्वर येथील मच्छीमार वस्तीत डोंगराशेजारी आहे. मंगळवारी (ता. ११) रात्री ११ च्या सुमारास मोठा दगड डोंगर उतारावरून घरंगळत आला आणि थेट मोरे यांच्या घराची भिंत फोडून स्वयंपाकघरात घुसला. यावेळी मोठा आवाज झाल्याने अंगणातील मंडळी स्वयंपाक घराकडे धावली. तेव्हा घरात आलेला दगड बघून सर्वांची वाचाच बंद झाली.
मोरे यांच्या घरावर दगड पडल्याची माहिती पोलिसपाटील चैतन्य धोपावकर यांना समजली. त्यांनी तातडीने जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, सरपंच नवनीत ठाकूर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विनायक शितप, उमेश शिंदे यांच्यासह अन्य ग्रामस्थांना माहिती दिली.
हेही वाचा– ओटवणेत मोटारीतून दारूसाठा जप्त
वीजपुरवठा खंडित झाला अन् प्राण वाचले
तातडीने सर्व ग्रामस्थांनी मोरे यांच्या घराकडे धाव घेतली. मोरे कुटुंबीयांना कोणतीच दुखापत झालेली नाही, हे कळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. जि. प. सदस्या ठाकूर यांनी सदर घटनेची माहिती तहसीलदार धोत्रेंना दिली. बुधवारी (ता. १२) लता धोत्रे यांनी तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. तातडीने पंचनामा करण्यात आला. यामध्ये घराचे ७७ हजाराचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. गुहागरचे पोलिस उपनिरीक्षक किरणकुमार कदम व वेळणेश्वर बीट अंमलदार गणेश कादवडकर यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
हेही वाचा– वैद्यकीय महाविद्यालयाचा शब्द सीएम पाळतील का ?
अंगणात गप्पा मारण्यासाठी एकत्र
केवळ दैव बलवत्तर म्हणून मोरे कुटुंबाचे प्राण वाचले. याला महावितरणचा खंडित झालेला वीजप्रवाह कारणीभूत ठरला. लक्ष्मण मोरे यांच्या घरातील सर्वांचे जेवण रात्री १०.४५ च्या दरम्यान उरकले. जेवणानंतर मोरे यांची पत्नी स्वयंपाकघर आवरून भांडी घासण्यासाठी मागील परसदारात जाणार होती. मात्र, त्याच वेळी वीजप्रवाह खंडित झाला. त्यामुळे हातातील काम थांबवून मोरे कुटुंब घरासमोरील अंगणात गप्पा मारण्यासाठी एकत्र आले. लक्ष्मण मोरे आणि त्यांचा मुलगा झोपण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी भूकंप झाल्यासारखा आवाज आला. त्यामुळे घरात काम करणारे दोघेही अंगणात पळाले.

News Story Feeds