संपूर्ण जगाचं लक्ष लागलेली ६९वी मिस युनिव्हर्स ही सौंदर्यस्पर्धा हॉलिवूड, फ्लॉरिडा इथं पार पडली. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत असलेल्या अॅडलिन कॅसेलिनोने चौथं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेमधील अॅडलिनचा राष्ट्रीय पोशाख हा ज्ञान आणि अध्यात्माचे प्रतीक असलेलं राष्ट्रीय फूल कमळापासून प्रेरित होऊन तयार केला होता.या स्पर्धेमधील ‘स्विमिंग सूट’ या फेरीत २२ वर्षीय अॅडलिनने निळ्या रंगाचा टू पीस परिधान केला होता.अॅडलिनचा जन्म कुवेत इथं झाला. वयाच्या १५व्या वर्षी ती भारतात आली आणि मुंबईत स्थायिक झाली. अॅडलिनने याआधी LIVA Miss Diva 2020 या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. ‘विकास सहयोग प्रतिष्ठान’ या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेसोबत ती काम करत आहे. त्याचसोब ती ‘पीसीओएस फ्री इंडिया’ या मोहिमेचाही चेहरा आहे. मिस युनिव्हर्स या सौंदर्यस्पर्धेत रॅम्पवॉक करताना अॅडलिनने साडी नेसली होती. तिच्या या लूकची खूप चर्चा झाली होती.