Cyclone Tauktae Updates मुंबई: तौक्ते वादळी वाऱ्याचा मुंबईला मोठा फटका बसला. अतिवेगाने वाहणाऱ्या पावसात झाडांची मोठी पडझड झाली. घाटकोपरमध्ये रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर आज सकाळी ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास झाडाची फांदी कोसळली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद होती. तसेच वादळी वाऱ्यामुळे मुंबई विमानतळावरील काही फ्लाईट्सदेखील परत पाठवाव्या लागल्या. तर काही विमानांना लँडिंगसाठी सुरतचा पर्याय देण्यात आला. (Cyclone Tauktae affects Mumbai Local Trains and Airport Services)

Also Read: मुंबई: तरूणाला विनामास्क पकडलं अन् पोलिसांना बसला धक्का

सकाळपासून धुवांधार पडणाऱ्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या एक नंबर ट्रॅकवरील घाटकोपर-विक्रोळी दरम्यान एक झाड ओव्हरहेड वायरवर कोसळले. ठाण्याकडे जाणाऱ्या धीम्या लोकलच्या डब्यावर हे झाड कोसळले. त्यामुळे काही काळासाठी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद होती. मध्य रेल्वेच्या घाटकोपर विक्रोळी दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक ही जलद मार्गावर वळवण्यात आली होती. पण नंतर हे पडलेलं झाड तिथून हटवण्यात आलं आणि ११ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हा मार्ग पूर्ववत सुरू झाला. मात्र लोकलच्या सर्व मार्गांवर सध्या वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

Also Read: विरारमधल्या गायब झालेल्या आजोबांचं अखेर गूढ उकललं…

तौक्ते वादळामुळे केवळ मुंबई लोकल सेवाच नव्हे तर विमानसेवादेखील बाधित झाली. वादळाचा आणि वाऱ्याचा वाढता जोर पाहता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) सर्व उड्डाणे (Take Off) आणि लँडिंग (Landing) दुपारी २ पर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. या कालावधीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या तीन विमानांची सेवा बाधित झाली असून स्पाईसजेटच्या एका विमानाचं लँडिंग सुरतकडे डायव्हर्ट करण्यात आलं. इंडिगोचं एक विमान लखनऊला परत पाठवण्यात आलं. तर दुसरं इंडिगोचं विमान हैदराबादकडे डायव्हर्ट करण्यात आलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here