लॉकडाउननंतर बिहारमध्ये (Bihar) कोरोना रुग्णसंख्यात मोठी घट पाहायला मिळाली होती. रुग्णवाढी कमी होत असल्याचं पाहून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये लॉकडाउन (Bihar Lock-down)वाढवण्याचा निर्णय घेतला. 16 मे 2021 ते 25 मे 2021 पर्यंत बिहारमध्ये लॉकडाउन (Lock-down) घेण्यात आला आहे. नितीश कुमार यांनी ट्विट करत लॉकडाउन वाढवल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या (CM) या ट्विटला रिप्लाय करत एका बिहारच्या तुरुणांनं आगळीवेगळी मागणी केली आहे. तरुणानं केलेली ही मागणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. गर्लफ्रेंडचा विवाह असल्यामुळे लॉकडाउनमध्ये लग्न-सोहळ्यावर बंदी घालावी, अशी विनंती तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना केली आहे. तरुणाचं ट्विट सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरत आहे. (young man tweet to cm nitish kumar and surprised demand said stop the girlfriend wedding)

कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचं पाहून नितीश कुमार यांनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. लॉकडॉनमध्ये कडक निर्बंध लावण्याचा मानस मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दाखवला. लग्नसोहळ्यामध्ये फक्त 20 जणांच पवानगी देण्यात आली आहे. सीएम नितीश कुमार (CM nitish kumar) यांच्या या ट्विटला रिप्लाय करत बिहारी तरुणानं लग्नसोहळ्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली. पंकज कुमार गुप्ता असं त्या तरुणाचं नाव आहे.

Also Read: बॉयफ्रेंडची पोलिसांकडे तक्रार करायला गेली अन् लग्न करूनच आली

पंकज यानं सीएम नितीश कुमार यांच्या ट्विटला रिप्लाय करत म्हटलं की, ‘सर, जर तुम्ही विवाह-सोहळ्यावर बंदी घातल्यास 19 मे रोजी होणारं माझ्या गर्लफ्रेंडचं लग्न रद्द होईल. जर असं झालं तर आयुष्यभर तुम्हचा आभारी राहिल.’

तरुणाच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. बिहारमध्ये हे ट्विट सध्या चर्चेचा विषय आहे. अनेकांना पंकज याचं ट्विट आवडलं असून त्याच्या भावनेचा आदर केला आहे. काहींनी सीएमकडे विवाह-सोहळ्यावर बंदी घाला, अशी मागणीही केली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here