अकोला ः कोरोना विषाणू कोविड-१९ (Covid 19) च्या पहिल्या लाटेत उपाचारासाठी उभी केलेली यंत्रणा बळकट करण्याऐवजी ती मोडून टाकण्यात आली. त्यामुळे दुसरी लाट आली तेव्हा उपचाराविना माणसं मेली. एकाचे मुंबई तर दुसऱ्याचे बारामतीवर लक्ष आहे. उर्वरित राज्य वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. हे सरकार म्हणजे सह्याजीराव झाले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. Criticism of Prakash Ambedkar on the Mahavikas front

कोविड विषाणू संसर्गाच्या संकटात आपातकालीन व्यवस्थापनावर राज्य शासनाला आलेल्या अपयशाबाबत व तिसरी लाट थोपविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (ता.१७) अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषद माहिती दिली. यावेळी राज्यातील आपातकालीन व्यवस्थेबाबत राज्य सरकार गंभिर नसल्याचा आरोप त्यांनी केला.

Also Read: खळबळजनक; तब्बल दहा खासगी कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय

मुख्यमंत्र्यांचे मुंबई तर उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीवरच लक्ष आहे. उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर असल्याचा आरोप ॲड. आंबेडकर यांनी केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काम नाही केलं तरी चालेल, पण राज्यातील आपातकाली समित्या बळकट करा. त्यामुळे नागरिकांना वेळेवर उपाचाराबाबत व आपतकालीन व्यवस्थापनाबाबत योग्य सल्ला या समित्या देवून मदत करू शकतील, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला. कोविडची दुसरी लाट अनियंत्रित झाल्याने राज्य सरकार अपयशी ठरल्यात असल्याने ते बरखास्त का करण्यात येऊ नये, या प्रश्नावर बोलताना ॲड. आंबेडकर यांनी सध्याच्या परिस्थितीत सह्या करण्यासाठी कुणीतरी लागतं. सरकार बरखास्त केलं तर सह्या कोण करेल? त्यामुळे हे सह्याजीराव सरकार सुरू असल्याचे ते म्हणाले.

मोदींनी ओढवून घेतलेले संकट

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला पराभूत करण्यासाठी कोविड-१९ ची दुसरी लाट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओढून घेतलेले संकट असल्याचा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

देवेंद्र फडणवीस

फडणविसांनी नागपुरातच बसावे!

पत्र लिहण्याच्या भानगडी करीत राज्यभर वनवन फिरण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातच बसावे. तेथे एक-दोन कोविड सेंटर सुरू करून नागपुरकरांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असा सल्ला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांना दिला आहे.

Also Read: सोनीया गांधींना काय पत्र लिहिता, एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मदत मागा

१२ कार्यकर्ते गेले, म्हणून मी लस घेतली!

कोरोना संकटात वंचित बहुजन आघाडीचे १२ कार्यकर्त्यांचे बळी गेले. मी मानत नाही, पाळत नाही म्हणून कार्यकर्तेही कोरोनाला मानत नाही, हे लक्षात आले. त्यांची सुरक्षा महत्त्वाची. मी लस घेतली तर कार्यकर्तेही घेतील, या उद्देशाने मी कोविड-१९ ची लस घेतली असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितेल. त्यांनी कार्यकर्ते व नागरिकांना लस घेण्याचे आवाहनही यावेळी केले.

संपादन – विवेक मेतकर

Criticism of Prakash Ambedkar on the Mahavikas front

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here