कात्रज : महापालिका हद्दीत कोरोना आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या जवळ जाण्याचे धाडस कोणी करत नाही. मात्र, नागरिक शेतकरी संघटना विधायक काम करत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे मृतदेह पॅक करून पुणे महापालिकेच्या रुग्णवाहिकेमध्ये देण्यापासून अंत्यविधीपर्यंत मदत करण्याचे काम ही संस्था करत आहे. त्याचबरोबर त्या घराचे निर्जंतुकीकरण करून तसेच त्या घरातील व्यक्तींना कोरोना संसर्ग असेल किंवा त्या कुटुंबात कोणीही व्यक्ती नसेल तर नागरिक शेतकरी संघाच्या वतीने सहकार्य करून विधी पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते.

Also Read: ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा लोणावळ्याला फटका, ८ मिमी पावसाची नोंद
नागरिक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे व त्यांचे सहकारी पुणे महापालीकेचे मुख्य अभियंता (विद्युत विभाग) श्रीनिवास कंदुल यांच्या मार्गदर्शनाने हे सामाजिक कार्य कोविड काळात करत आहेत. कोरोना रूग्णांना रुग्णालयात शासनाच्या माध्यमातून दाखल करून मोफत उपचार मिळवून देण्याकरिताही संस्थेचे मदत कार्य सुरु आहे. त्याचबरोबर रूग्णांना रक्त व प्लाझ्मा मिळवूण देण्याकरता सातत्याने प्रयत्न चालू असतात. महापालिका हद्दतील घरात ज्यांना शक्य आहे अशा रुग्णांना घरी जाऊन जेवण व त्यांना लागणाऱ्या वस्तू देणे, त्याचबरोबर, सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून शहरात व जिल्ह्यातील साधारण दोन लाख कुटुंबातील व्यक्तींना जेवण व किराणा किट वाटप करण्याचे काम संस्थेमार्फत मंदीर, मस्जिद, चर्च, कॉलेज, सोसायटी, उद्योजक, व्यावसायिक यांच्या मदतीने पार पाडले आहे.
या सामाजिक कार्यात चंद्रकांत मोरे यांना मदत करणारे दिपक चौघुले, नितीराज कदम, पप्पु शेडगे, नितीन सुर्वे, राजनंदिनी गव्हाणे, कोमल सांवत, वैष्णवी वंडकर, मोनाली विधाते, विश्वराज विधाते, केशव शेटे, कृतिका जोशी, सुग्रीव धावारे हे सहकारी मदत करतात.
Also Read: ”फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना महाविकास आघाडीने काळीमा फासला”
”कोविड काळातील नागरी शेतकरी संघटनेचे कार्य उल्लेखनिय आहे. कोविड काळात त्यांनी काम करण्याची इच्छा बोलून दाखविल्यानंतर कोविडबाधित रुग्ण घरीच मृत झाल्यानतंर त्याला कोणी उचलत नाही आणि याठिकाणी काम होण्याची गरज लक्षात घेऊन आम्ही त्यांच्यासााठी ही जबाबदारी निश्चित केली. त्यानंतर शहरात कुठेही व्यक्ती मृत झाली तरी या संघटनेकडून कधीही फोन केला तरी शहरातील अनेक भागात जाऊन मदत करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे ही संघटना विनाशुल्क सर्व काम करत आहेत.”
– श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग महापालिका, पुणे.
Also Read: कोरोना मुक्तीसाठी झटतायेत पिसर्वेकर
Esakal