पुणे – ‘कोरोनाची (Corona) लागण झाली तेव्हा काय करावे हे समजत नव्हते. शरीरात अशक्तपणा जाणवत होता आणि जेवणाला चव येत नव्हती. या आजारामुळे कित्येक लोकांनी जीव गमावला. त्यामुळे मला पण भीती वाटू लागली. मात्र माझ्या कलेच्या छंदाने (Hobby) मला जागण्याची नवी उमेद दिली. त्यामुळे स्वतःमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकलो आणि या आजारातून पूर्णपणे बरा झालो.” असा अनुभव सांगत होते कोरोनावर मात करणारे 69 वर्षीय मल्लिकार्जुन सिंदगी. (Mallikarjun Sindagi Coronavirus Art Hobby Life)

Art

कात्रज येथे राहणारे सिंदगी हे निवृत्त कला शिक्षक आहेत. पत्नी, दोन नातवंडांसह ते राहतात. तर शेजारीच त्यांची मुलगी राहते. निवृत्तीनंतर चित्रकलेकडे जरा दुर्लक्ष झाले आणि विविध सामजिक, शेती व शैक्षणिक कार्यात ते व्यस्त झाले. त्यामुळे सतत कामानिमित्त राज्यातील विविध ठिकाणी दौरा असायचा. एकदा दौऱ्यावरून घरी आल्यावर त्यांना ताप आला. तपासणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. मात्र कुटुंबातील इतरांना लागण झाली नव्हती. त्यांनतर घरीच उपचार सुरू झाले. कोरोनामुळे कुटुंबियांना भेटता येत नव्हते. त्यामुळे एकटेपणा अधिक जाणवू लागला. तर हा एकटेपणा दूर करण्यासाठी चित्रकला काढण्यास पुन्हा सुरवात केली. या कलेमुळे तासंतास रंगांच्या विश्वात ते रमत होते. सकारत्मक विश्वास निर्माण झाला आणि ते कोरोनावर मात करू शकले.

Art

मल्लिकार्जुन म्हणाले, “या कठीण काळात माझा कलेने मला जागविले. उपचार सुरू असताना दररोज चार ते पाच चित्र काढत होतो. आता सुद्धा चित्र काढण्याचे काम करत आहे. चित्रांच्या माध्यमातून आनंद आणि सकारात्मक विचार यावा म्हणून निसर्गाच्या सौंदर्याला साकारत आहे.”

Art

‘मनोबल चांगला असल्यावर कोणत्याही परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. बऱ्याच वेळी बाधित रुग्ण घाबरून जातात. अशा वेळी विविध गोष्टींमध्ये स्वतःला रमवून मनातील भीती कमी करणे गरजेचे आहे.

– मल्लिकार्जुन सिंदगी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here