छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आणि दिव्यांका त्रिपाठी सध्या ‘खतरों के खिलाड़ी 11’ या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. दिव्यांका आणि श्वेताने केपटाउनमध्ये धमाल करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमधील दोघींच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. क्रॉप टॉप आणि डेनिम असा श्वेताचा लूक आहे. वयाच्या ४०व्या वर्षी श्वेताचं फिटनेस पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले. दिव्यांकाने ब्लॅक कलरचा वन पीस परिधान केला असून त्यावर जॅकेटमुळे तिचा लूक ‘कूल’ दिसत आहे. ‘खतरों के खिलाड़ी 11’मध्ये दिव्यांका आणि श्वेताला यश मिळतं का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.