प्राणीप्रेमी असलेले अनेक लोक त्यांच्या आवडीनुसार घरात कुत्रे, मांजरी असे विविध प्राणी पाळतात. मराठीतील अनेक कलाकारांनीही त्यांच्या घरी श्वान पाळला आहे.अभिनेत्री जुई गडकरीला कुत्रे आणि मांजरी या दोघांचीही आवड आहे.तिच्या घरी सात ते आठ मांजरी आहेत. अभिनेत्री मिताली मयेकरने पाळलेल्या श्वानाचे नाव ‘डोरा’ असं आहे. पूजा सावंतने नुकतंच एका आजारी पक्ष्याला जीवदान दिलं. सध्या त्या पक्ष्याची काळजी पूजाच घेत आहे. अभिनेत्री मानसी नाईकच्या घरातही आठ ते दहा मांजरी आहेत. प्रार्थना बेहरेकडे दोन श्वान आहेत. त्यांच्यासोबतचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.