अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली.सोनाली आणि कुणाल जून किंवा जुलै महिन्यात लग्न करणार होते. मात्र लॉकडाउन आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांचा प्लॅन बदलला. मार्च महिन्यात लग्नाचं शॉपिंग आटपून सोनाली दुबईला कुणालकडे गेली होती. तिथेच ७ मे रोजी एका मंदिरात हे दोघं अत्यंत साध्या पद्धतीने कोणताही गाजावाजा न करता लग्नबंधनात अडकले. सोनालीने वाढदिवसानिमित्त १८ मे रोजी या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. सोनाली आणि कुणालचे आईवडील व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून या लग्नाला उपस्थित होते. सोनाली आणि कुणाल यांचा गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दुबईतच साखरपुडा पार पडला. परिस्थिती ठीक होताच कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित ‘ड्रीम वेडिंग’ करणार असल्याचं सोनालीने सांगितलं.