रत्नागिरी : आज जगभरात व्हॅलेन्टाईन डे साजरा होत आहे. तरूण तरूणींसह सर्वच जण हा दिवस साजरा करता आहेत. परंतु, आजच्या दिवशी आदर्श घ्यावा अशा अनेक प्रेमकहाण्या पुढे येत आहेत. अशीच एक आदर्श प्रेमकहाणी रत्नागिरीत घडली आहे. येथील एका नर्सने कर्करोग असलेल्या प्रथमेशसोबत आपल्या आयुष्याची गाठ बांधून सर्वांसमोरच आदर्श घालून दिला आहे.
हे पण वाचा – चंद्रकांत पाटील यांना घरभर चिठ्ठ्या वाटतानाचा फोटो मी पाहिला : शरद पवार
रत्नागिरीतल्या हातखंबा गावातील प्रथमेशला वयाच्या २० व्या वर्षीच कर्करोगासरख्या आजाराने ग्रासलं होतं. पण पेशाने नर्स असणाऱ्या सोनालीने प्रथमेशला हा आजार आहे याची माहिती असून त्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं. या भयानक रोगावर मात करण्यासाठी सोनाली प्रथमेशच्या मागे प्रेमाची सावली सारखी उभी राहिली आहे.
हे पण वाचा – भीमा – कोरेगाव प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा : शरद पवार
आपल्या आजारावरील किमोथेरेपी घेऊन घरी परतलेल्या प्रथमेशची अवस्था त्याच्याच वाडीतील सोनालीने पाहिली. सोनाली पेशाने नर्स असल्याने प्रथमेशला तिनं समजून घेतलं. या रोगावर औषध उपचार सुरु असताना प्रथमेशला आधार दिला. त्याच्यासोबत उभी राहिली. टोरोटोमा ट्यूमरच्या कॅन्सरशी सामना करत असताना प्रथमेश आणि सोनाली एकमेकांना चांगले ओळखू लागले. याचवेळी सोनालीनं प्रथमेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आजारात प्रथमेशला जोडीदाराच्या प्रेमाची साथ हवी होती म्हणून सोनालीने प्रथमेशशी विवाह करण्याता धाडसी निर्णय घेतला. प्रथमेशला आजार असणाऱ्या टोरोटोमा ट्युमरच्या कर्करोग वैवाहिक आयुष्यात परिणाम करणारा होता. परंतु, सोनालीने प्रथमेशला साथ दिली. आज या दोघांच्या लग्नाला दीड वर्ष पूर्ण झाली. दोघेही खूप चांगले वैवाहिक आयुष्य जगत आहेत.

News Story Feeds