Coronavirus in India, Covid-19, Latest Updates : मागील तीन दिवसांपासून देशातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन लाखांच्या खाली आली आहे. पण कोरोना मृताची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. महिनाभरापासून देशात कोरोना मृत्यूचे नवनवीन विक्रम होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात कोरोना रुग्णांचा विक्रमी मृत्यू (highest in a single day) झाला आहे. मागील 24 तासांत देशात 4 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी (highest in a single day) आकडेवारी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देश होरपळून निघत असल्याचं भयावह चित्र दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज 4 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. एकीकडे नवीन रुग्णसंख्यामध्ये घट पाहायला मिळत असली तरी मृताच्या संख्येनं मात्र, चिंता वाढवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Health Ministry) माहितीनुसार, देशात आतापर्यंत दोन लाख 83 हजार 248 जणांचा मृत्यू झाला आहे. दररोज वाढणाऱ्या मृताच्या संख्येनं चिंता वाढवली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या(Health Ministry) माहितीनुसार, मंगळावरी देशात दोन लाख 67 हजार 334 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत तीन लाख 89 हजार 851 जणांनी कोरोना मात केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटी 54 लाख 96 हजार 330 इतकी झाली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दोन कोटी 19 लाख 86 हजार 363 इतकी आहे. देशात सध्या 32 लाख 58 हजार 9 हजार 302 जणांवर उपचार सुरु आहेत.

Also Read: ‘कोरोना झालेल्यांना 9 महिन्यांनी लस द्यावी’

देशात दिवसभरात सर्वाधिक सुमारे चार लाखांपर्यंत कोरोनाबाधित आढळून आलेले असताना आपण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत दोन टक्क्यांहून कमी लोकसंख्येपर्यंत संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहोत, असं केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. भारतातील एकूण लोकसंख्येच्या १.८ टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर ९८ टक्के लोकसंख्या अद्याप या संसर्गापासून दूर आहे, असंही त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर गेल्या पंधरा दिवसांत सातत्याने अॅक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचंही सरकारनं यावेळी सांगितलं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here